पोलीस पाटलाचा महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 21:06 IST2020-08-15T21:01:44+5:302020-08-15T21:06:11+5:30

पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Police have registered a case against police Patil | पोलीस पाटलाचा महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

पोलीस पाटलाचा महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

मूर्तिजापूर : तालुक्यातील एका गावातील पोलीस पाटलाने शेजारच्या गावातील महिलेचा विनयभंग करुन तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घृणास्पद घटना पिडीत महिलेने पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून समोर आली आहे. मंगरूळ कांबे येथील पोलीस पाटील दिनेश वाकोडे याने महिलेचा विनयभंग व बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास पिडीत महिलेस जिवे मारण्याची धमकी दिली. शेलू बोंडे येथील एका महिलेने गुरूवारी १३ अॉगष्ट रोजी रात्री उशिरा मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पोलीस पाटील दिनेश वाकोडे याने गेल्या २० जुलैच्या रात्री दीड वाजता तिचे दार ठोठावले. घराबाहेर येताच हात धरून ओढत नेऊन विनयभंग केला. त्यापूर्वी १२ जुलैच्या रात्री साडेअकराच्या दरम्यान लघूशंकेसाठी घराबाहेर आले असताना आरोपीने बळजबरी करुन अतिप्रसंग केला व घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास मारुन टाकण्याची धमकी दिली, असे पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ग्रामीण पोलीसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या ३७६, ३५४, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पीएसआय धनंजय रत्नपारखी पुढील तपास करीत आहेत (शहर प्रतिनिधी )

Web Title: Police have registered a case against police Patil