सिने अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध अकोल्यात पोलीस तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 17:19 IST2020-03-04T17:19:12+5:302020-03-04T17:19:23+5:30

अभिनेत्री केतकी चितळे, सुरज शिंदे आणि मनोज गायकवाड या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Police complaint in Akola against actress Ketaki Chitale | सिने अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध अकोल्यात पोलीस तक्रार

सिने अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध अकोल्यात पोलीस तक्रार

अकोला : मराठी सिने अभिनेत्री केतकी चितळे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यानंतर या अभिनेत्रीसह दोघांविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे पूर्व विधानसभा अध्यक्ष अंकुश गावंडे यांनी तक्रारीत नमूद केले की, ३ मार्च रोजी ते त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून अभिनेत्री केतकी चितळे यांच्या फेसबुक अकाउंटवर गेले. त्यांना केतकी यांच्या फेसबुक वॉलवर जातीयवादी व धार्मिक तेढ निर्माण करणारी तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करणारी पोस्ट लिहिलेली दिसून आली. फेसबुक पोस्टवर गैरअनुसूचीत जाती, जमातीचा सदस्य सुरज शिंदे या व्यक्तीनेही भावना दुखविणारा मजकूर लिहिला आहे. तेव्हा अभिनेत्री केतकी चितळे, सुरज शिंदे आणि मनोज गायकवाड या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी अभिनेत्री केतकी चितळे यांचेच हे अकाउंट आहे की, त्यांचे बनावट अकाउंट कुणीतरी बनवले आहे, याचा शोध घेत असून, पुढील कारवाई करणार असल्याची माहिती आहे.

 

Web Title: Police complaint in Akola against actress Ketaki Chitale