शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

सेतू केंद्रावर शेतकर्‍यांची लूट

By admin | Updated: August 6, 2014 01:02 IST

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या लाभार्थींकडून शासकीय नियमानुसार फी न घेता एका दाखल्याचे ६५ रुपये घेतल्याची

तेल्हारा : उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या लाभार्थींकडून शासकीय नियमानुसार फी न घेता एका दाखल्याचे ६५ रुपये घेतल्याची तक्रार लाभार्थ्याने तहसील कार्यालयात केल्याने तहसीलदारांनी यासंदर्भात तत्काळ दखल घेऊन सेतू केंद्र संचालकांना कार्यालयात बोलावून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तेल्हारा तालुक्यातील कोठा येथील प्रवीण प्रल्हाद तायडे व दिवाकर अहेरकर हे ४ ऑगस्ट रोजी शेगाव नाक्याजवळील श्रीकांत जनार्दन बोरसे यांच्या सेतू केंद्रावर उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी गेल्यानंतर सेतू केंद्र संचालकाने एका उत्पन्नाच्या दाखल्याचे ६५ रुपये द्या, असे दोघांनाही बजावले. परंतु शासकीय नियमानुसार एवढी रक्कम होत नाही, तुम्हाला ६५ रुपये जर पाहिजे असल्यास त्याची रितसर पावती आम्हाला द्या, असे लाभार्थ्याने म्हटले असता त्यांनी पावती देण्यास नकार देऊन अरेरावीची भाषा वापरली. या प्रकाराची रितसर तक्रार तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे नोंदविली. त्यांनी तत्काळ दखल घेत सेतू केंद्र संचालकाला कार्यालयात बोलावून त्यांची चांगली कानउघाडणी केली. या सेतू केंद्रावर लाभार्थींंकडून शासकीय नियमानुसार रक्कम न घेता अव्वा ते सव्वा रक्कम घेतली जाते. या सेतू केंद्रात रेटबोर्डचा पत्ताच नाही. केलेल्या कामाची पावती मिळत नाही. ज्यांच्या नावावर सेतू केंद्र आहे, तो या ठिकाणी न बसता दुसराच व्यक्ती केंद्र चालवितो. यासाठी लागणार्‍या कागदपत्रांवर स्वाक्षरीदेखील संबंधित व्यक्तीच करतो. उत्पन्नाच्या दाखल्याचे नियमानुसार ३५ रुपये, सातबाराचे २२.५0 पैसे आणि प्रतिज्ञालेखाचे ३२.५0 पैसे अशी शासकीय दराने रक्कम घ्यावयास पाहिजे असताना संबंधित सेतू केंद्र संचालक मनमानीपणे वसूल करतो. ऑनलाईन पावती कधीही दिल्या जात नाही. शिवाय वरिष्ठांनाही काही जुमानत नाही. त्यामुळे सेतू केंद्राचा एवढा लाड कशासाठी, हा प्रश्न या ठिकाणी वादाचा बनला आहे. लाभार्थींकडून जादा रक्कम वसूल करणार्‍या सेतू केंद्राचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी तक्रारकर्त्यांंनी केली आहे.