पेट्रोल पंप मालकाला लुटणाऱ्या आरोपीकडून देशी कट्टा, दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 16:12 IST2019-05-26T16:12:39+5:302019-05-26T16:12:52+5:30

मूर्तिजापूर : येथील पेट्रोल पंप मालकाला गावठी (देशी) कट्ट्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपी कडून शहर पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेला देशी कट्टा व एक दुचाकी आणि १ हजार रुपये रोख जप्त केले.

Pistol, two-wheelers seized from a robber Murtijapur | पेट्रोल पंप मालकाला लुटणाऱ्या आरोपीकडून देशी कट्टा, दुचाकी जप्त

पेट्रोल पंप मालकाला लुटणाऱ्या आरोपीकडून देशी कट्टा, दुचाकी जप्त

मूर्तिजापूर : येथील पेट्रोल पंप मालकाला गावठी (देशी) कट्ट्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपी कडून शहर पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेला देशी कट्टा व एक दुचाकी आणि १ हजार रुपये रोख जप्त केले.
           २४ मे रोजी हरीओम पेट्रोल पंपावर पेट्रोल पंप मालक कमल लालवानी यांना देशी कट्टयाचा धाक दाखवून दोन आरोपींनी २ हजार रुपयांनी लुटले होते. यातील कृष्णा कनोजे नामक आरोपीला पोलीसांनी अटक केली व दुसरा आरोपी गोपी अहेरवाल पसार झाला. दरम्यान शनिवारी अटक असलेल्या आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला रविवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी दरम्यान आरोपी कृष्णा कनोजे याचे राहते घर परदेशी पुरा येथून गुन्ह्यात वापरलेला एक देशी कट्टा, एक हजार रुपये रोख व २० हजार रुपये किंमतीची एक दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे.पुढील तपास ठाणेदार दत्तात्रेय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी करीत असून, फरार असलेला आरोपी गोपी अहेरवाल याचा शोध घेत आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Pistol, two-wheelers seized from a robber Murtijapur