Pink Bollworm outbreak on cotton in Akola district | कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रकोप वाढला!
कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रकोप वाढला!

- राजरत्न सिरसाट

अकोला :आतापर्यंत सुप्त अवस्थेत असलेल्या गुलाबी बोंडअळीचा कपाशीवर प्रकोप वाढला असून,अगोदरच विविध संकटाच्या मालिकांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा हे संकट उभे ठाकले आहे.बोंडअळीने त्रस्त अकोला जिल्ह्यातील शेतकºयांने तर चार एकरावरील कापसाचे उभे पीक कापून टाकले आहे.या अस्मानी,सुलतानी संकटाचा सामना करणारा शेतकरी आता धास्तावला आहे.
यावर्षी सुरुवातीला पाऊस उशिरा सुरू झाल्याने पेरण्या खोळबंल्या होत्या. पाऊस आला, पेरण्या झाल्या; पण पावसाचा दीर्घ खंड पडल्याने अनेक भागात पेरण्या उलटल्या. शेतकºयांना पेरणी केलेल्या पिकांवर नांगर फिरविला. मूग, उडीद पीक हातचे गेले. उष्ण, दमट वातावरण किडींना पोषक ठरल्याने सोयाबीन पिकावर पाच जातींच्या किडींनी आक्रमण केले. कपाशीवर तुडतुडे, मावासारखी कीड वाढली होती. इतर पिकावरही कीड वाढली. या किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांना तीन ते चार वेळा कीटकनाशक फवारणी करावी लागल्याने खर्च वाढला. या स्थितीचा सामना करीत असतानाच पीक वाढीच्या अवस्थेतच पावसाने झडी लावली. दोन महिने सतत पाऊस पडत होता. सततच्या पावसामुळे शेतात बुरशी तयार झाली. पिकांना व त्यांच्या मुळांना प्रकाशसंश्लेषण होत नसल्याने पिके सडण्याचे प्रकार घडले. पीक परिपक्वतेच्या काळातही पाऊस उसंत देत नव्हता. परतीच्या पावसानेही कहर केल्याने उरले-सुरले पीकही हातचे गेले. सोयाबीन, ज्वारी काळी ठिक्क र पडली. कपाशी पाण्यात भिजली. परिणामी प्रतवारी घसरल्याने या पिकांचे दर बाजारात घटले. नाफेडप्रमाणे व्यापाºयांनही प्रतवारीचे निकष लावल्याने हाती आलेले अल्प पिकांना अल्प दरात विकून शेतकºयांना समाधान मानावे लागत आहे.
या परिस्थितीचा सामना करीत असताना बोंडअळीने त्रस्त अकोला जिल्ह्यातील शेतकºयांनी चार एकरावरील कपाशीचे पीक कापून टाकले आहे. यामुळे कृषी शास्त्रज्ञासह कृषी विभागात खळबळ उडाली आहे. ही अळी एका शेतातून वेगाने दुसºया शेतातील कपाशीवर आश्रय घेत कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते.

- कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणसाठी कृषी विद्यापीठाच्या कापूस प्रक्षेत्रावर कामगंध सापळे लावण्यात आले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात बोंडअळीचे पतंग सापडले आहेत. अनेक भागातील कापूस पट्ट्यात ही परिस्थिती असू शकते; परंतु शेतकºयांनी घाबरू न न जाता कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कीटकनाशक फवारणी करावी तसेच कामगंध सापळ््यांचा वापर करावा.
डॉ. डी.बी. उंदिरवाडे,
विभागप्रमुख कीटकशास्त्र,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

 

Web Title: Pink Bollworm outbreak on cotton in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.