परवानगी ३२८.६८ चाैरस मीटरची ; बांधकाम केले १०२४ चाैरस मीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:03+5:302021-07-11T04:15:03+5:30
महापालिकेच्या नाकावर टिच्चून शहरात अनधिकृत इमारती उभारणे, ‘टीडीआर’देताना मनपा प्रशासनासह शासनाची दिशाभूल करणे, जाणीवपूर्वक हार्डशिप ॲन्ड कम्पाउंडिंगचे प्रस्ताव सादर ...

परवानगी ३२८.६८ चाैरस मीटरची ; बांधकाम केले १०२४ चाैरस मीटर
महापालिकेच्या नाकावर टिच्चून शहरात अनधिकृत इमारती उभारणे, ‘टीडीआर’देताना मनपा प्रशासनासह शासनाची दिशाभूल करणे, जाणीवपूर्वक हार्डशिप ॲन्ड कम्पाउंडिंगचे प्रस्ताव सादर न करणे आदी प्रकार सर्रासपणे सुरु आहेत. नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना हाताशी धरुन ही कामे निकाली काढली जात आहेत. तसेच नियमांवर बाेट ठेवणे पसंत करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल वरिष्ठांची दिशाभूल करुन त्यांची इतर विभागात बदली करण्याचे काम स्थानिक राजकीय नेते करीत असल्याने एकूणच या विभागाचे कामकाज रसातळाला गेल्याचे दिसत आहे. या सर्व बाबींचा फायदा अनधिकृत बांधकाम करुन उजळमाथ्याने वावरणारे मालमत्ता धारक घेत आहेत. सिंधी कॅम्पमधील हिराबाइ प्लाॅटमध्ये धन्नुमल आलिमचंदानी यांना मनपाने रहिवासी इमारत बांधण्यासाठी ३२८.६८ चाैरस मीटरची परवानगी दिली हाेती. आलिमचंदानी यांनी सर्व निकष,नियम धाब्यावर बसवित चक्क १ हजार २४ चाैरस मीटरचे बांधकाम केले. मनपाच्या नगररचना विभागाने प्रत्यक्षात स्थळ निरीक्षण केले असता मालमत्ता धारकाने तब्बल ६९५.३२ चाैरस मीटरचे अनधिकृत बांधकाम केल्याचे समाेर आले.
एकाच इमारतीवर तिसऱ्यांदा कारवाई
या इमारतीवर महापालिकेने यापूर्वी दाेन वेळा निष्कासनाची कारवाई केली हाेती. त्या प्रत्येकवेळी इमारतीचा अतिक्रमित भाग स्वत: ताेडणार असल्याचे सांगत मालमत्ता धारकाकडून अवधी मागितला जात हाेता. शनिवारी या इमारतीवर तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली,हे विशेष.