शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांना दुष्काळाच्या धर्तीवर मदत - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 11:30 PM

संवेदनशील राहून मिशन मोडवर काम करावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

अकोला: दुष्काळ निवारणासाठी ज्या उपाययोजना केल्या जातात व दूष्काळग्रस्तांना जे निकष लावून मदत दिली जाते तेच निकष अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी लागू राहतील, हा ओला दूष्काळ आहे, अध्यादेश निघेल तेव्हा निघेल; मात्र शासकीय यंत्रणांनी ६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण पंचनामे करावे तसेच संवेदनशील राहून मिशन मोडवर काम करावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी अकोल्यातील म्हैसपूर फाटा, लाखनवाडा, कापशी, चिखलगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन पीक पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार श्रीकांत देशपांडे, गोपीकिशन बाजोरिया, आ. प्रकाश भारसाकळे, गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, नितीन देशमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, यांच्यासह बळीराम शिरस्कार, महापौर विजय अग्रवाल, प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर आदी उपस्थित होते.अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. हाती आलेले पीक निघून गेल्याने शेतकरी निराशेच्या छायेत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी झालेल्या नुकसानाची व्याप्ती सर्वात मोठी आहे. त्यामुळे यामध्ये देण्यात येणारी मदतही मोठी असणार आहे. शेतकºयांना पुन्हा उभे करण्यासाठी दुष्काळ काळातील सर्व मदत ओला दुष्काळाच्या काळातही सर्व शेतकºयांना देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.शेतकºयांना पुन्हा उभे करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी पंचनाम्यासाठी संवेदशीलपणे कार्य करावे, असे निर्देश देतानाच पावसामुळे जवळपास १०० टक्के शेत पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, तूर ही पिके शेतकºयांच्या हातून गेली आहे. त्यामुळे पंचनाम्याच्या कामासाठी आवश्यकता असल्यास इतर विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या मनुष्यबळाचा उपयोग करावा, असे आवाहन केले.शेतकºयांना कोणत्याही वसुलीच्या समोर जावे लागू नये, वीज कापल्या जाऊ नये याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना सूचना कराव्यात. शेतकºयांना सुलभपणे मदत मिळावी, त्यांना सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी हेल्पलाइन सुरू करावी. नुकसानीची मदत मिळण्यासाठी पंचनामा करणाºया यंत्रणांनी अपवादही सोडू नये. शेतकºयांना मदत मिळावी, यासाठी यंत्रणेने हे आपले काम आहे, असे मानून मिशन मोडमध्ये कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी जिल्हह्यातील परिस्थितीची थोडक्यात माहिती देऊन यंत्रणांनी तत्परतेने काम करावे, असे निर्देश दिले. जिल्हाधिकारी पापळकर यांनी जिल्ह्याच्या नुकसानाच्या माहितीचे सादरीकरण केले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAkolaअकोलाFarmerशेतकरी