शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

महागाईच्या विरोधातील काँग्रेसच्या अभियानात जनतेने सहभागी व्हावे - दिलीप सरनाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 12:31 PM

Akola News : अभियानात जनतेने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रभारी ॲड.दिलीप सरनाईक यांनी केले आहे.

अकोला- केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे संपुर्ण देशात महागाईने उच्चांक गाठला असून त्यामुळे सर्व सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. फक्त पेट्रोल आणि डिझेलचे नव्हे तर प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. महागाईच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यात जनजागरण अभियानाला 14 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून त्याच अनुषंगाने अकोला जिल्ह्यात जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक अमानकर व जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते , तालुका अध्यक्ष, अभियानचे समन्वयक व प्रमुख पदाधिकारी गावागावात जाऊन जनजागृती करीत आहेत.या अभियानात जनतेने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रभारी ॲड.दिलीप सरनाईक यांनी केले आहे. सदर अभियान मध्ये काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी गावागावात जाऊन बैठकी घेऊन लोकांना केंद्र सरकारच्या नाकर्तेपणा समजाऊन सांगत आहेत. अभियान अंतर्गत काँग्रेस नेते गावातील स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी भेटी देऊन तसेच कोरोना काळात ज्यांचा मृत्यू झाला अश्या परिवाराचे सांत्वन करीत आहेत. ग्रामीण भागात रात्रीचा मुक्काम करून सकाळी गावात  प्रभात फेरी काढणे असा कार्यक्रम काँग्रेस नेते राबवित आहेत. या अभियानाला ग्रामीण भागात प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास 100 गावात हे अभियान पोहचले आहे.29 तारखे पर्यंत चालणाऱ्या या अभियानात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून व्यापक स्वरूपात हे अभियान राबवावे असे आवाहन  जिल्हा प्रभारी ॲड. दिलीप सरनाईक व सह प्रभारी नंदकिशोर कुईटे यांनी केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेस