शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

 पासपोर्ट योजनेला पोलिसांचाच कोलदांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 10:42 AM

गोपनीय शाखेच्या पोलिसांनी पासपोर्टसाठी रहिवासी पत्त्यावर न जाता पोलीस ठाण्यात बोलावूनच पडताळणी वर्षानुवर्षापासून सुरू ठेवल्याचे वास्तव आहे.

- सचिन राऊत

 अकोला : विदेशात जाण्यासाठी असलेला पासपोर्ट (पारपत्र) काढताना अर्जदारांची पडताळणी करण्यासाठी गोपनीय शाखेच्या पोलिसांनी पडताळणीच्या वेळी संबंधित अर्जदाराच्या रहिवासी पत्त्यावर जाऊन पडताळणी करणे बंधनकारक आहे; मात्र जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या गोपनीय शाखेच्या पोलिसांनीपासपोर्टसाठी रहिवासी पत्त्यावर न जाता पोलीस ठाण्यात बोलावूनच पडताळणी वर्षानुवर्षापासून सुरू ठेवल्याचे वास्तव आहे. त्यामुळे एम पासपोर्ट योजनेला पोलिसांचाच कोलदांडा असल्याचे स्पष्ट होत आहे.शहरासह जिल्ह्यातील नागरिक पासपोर्ट काढण्यासाठी अकोल्यातच झालेल्या कार्यालयात अर्ज सादर करतात. त्यानंतर या अर्जावर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच चारित्र्य पडताळणीसाठी पासपोर्ट कार्यालयाद्वारेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत अर्जदाराचे दस्तावेज आॅनलाइन पाठविण्यात येतात. त्यानंतर या शाखेतून अर्जदार ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे त्या संबंधित पोलीस ठाण्यात पडताळणीसाठी हा अर्ज आॅनलाइन पाठविण्यात येतो. अर्जदारांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात गोपनीय शाखा कार्यरत असून, येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी नियमानुसार अर्जदाराच्या घरी जाऊन पडताळणी करावी तसेच अर्जदार त्या पत्त्यावर राहतो का नाही, याचीही पडताळणी करण्याची जबाबदारी गोपनीय शाखेच्या कर्मचाºयांची आहे. तसेच अर्जदाराच्या घरासमोरच त्याचे छायाचित्र घेऊन ते आॅनलाइन सादर करण्याचीही सोय या शाखेच्या कर्मचाºयांना करून देण्यात आलेली आहे; मात्र जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये पासपोर्टसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांना बोलावण्यात येत असल्याचे वास्तव आहे. यावरून गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी कामात हलगर्जी करीत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. या बाबींची होते पडताळणीअर्जदार देत असलेल्या पत्त्यावर राहतो की नाही, याची पडताळणी केल्यानंतर त्याच्या घरासमोरच छायाचित्र घेण्यासाठी गोपनीय शाखेला एक आयपॅड देण्यात आलेला आहे. या ठिकाणी छायाचित्र घेतल्यानंतर आधार कार्ड किंवा दुसरा रहिवासी पुरावा याच ठिकाणावर स्कॅन करणे गरजेचे आहे. त्यानंतर ही पडताळणी आॅनलाइन सादर केल्यानंतर त्याची एक प्रत अर्जदाराला तर दुसरी प्रत गोपनीय शाखेत ठेवण्यात येते. आयपॅडवर चढली धूळगोपनीय शाखेच्या पोलीस कर्मचाºयांच्या अडचणी लक्षात घेता त्यांना आयपॅड देण्यात आले. आयपॅडमध्ये नेट सुविधेसह पासपोर्ट पडताळणीची वेबसाइट आणि अ‍ॅपही देण्यात आले आहे. त्यामुळे पडताळणी आणि इतर प्रक्रिया तातडीने होण्यास मदत होते; मात्र अद्यापही बहुतांश पोलीस आॅयपॅडचा वापर करीत नसल्याचे त्यावर धूळ चढली आहे.

टॅग्स :passportपासपोर्टAkolaअकोलाPoliceपोलिस