महावितरणच्या मालमत्तेवर फलक; देव कमल हॉस्पीटलच्या संचालकाविरुद् गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 06:40 PM2021-01-09T18:40:27+5:302021-01-09T18:43:38+5:30

MSEDCL News डॉ.आशिष तापडीया यांच्यावर शासकीय मालमत्तेचा अवैध वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Panel on MSEDCL property; Crime against the director of Dev Kamal Hospital | महावितरणच्या मालमत्तेवर फलक; देव कमल हॉस्पीटलच्या संचालकाविरुद् गुन्हा

महावितरणच्या मालमत्तेवर फलक; देव कमल हॉस्पीटलच्या संचालकाविरुद् गुन्हा

Next
ठळक मुद्देजाहिरात हटविण्याबाबत संबंधित हॉस्पीटल प्रशासनाने दुर्लक्ष केले.महावितरणकडून संबंधितांना कायदेशीर नोटीसा देण्यात आल्या होत्या.

अकोला: महावितरणने केलेल्या आवाहनाला तसेच महावितरणने कायदेशीर नोटीस देऊनही महावितरणच्या मालमत्तेवरील देव कमल हॉस्पीटलची जाहिरात फलके न काढल्याने महावितरण शहर विभागाच्यावतीने संबंधित हॉस्पीटलचे संचालक डॉ.आशिष तापडीया यांच्यावर शासकीय मालमत्तेचा अवैध वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील वीज खांब, रोहित्रे,फिडर पीलर ,डी.पी.इत्यादी महावितरणच्या यंत्रणेवर किंवा यंत्रणेच्या अगदी जवळ/खाली अनेक संस्था ,व्यावसायीक,जाहिरातदारांनी आपल्या प्रचार प्रसिध्दीसाठी अनाधिकृत फलके,पोस्टर्स,बॅनर्स व होर्डींग लावले होते. या प्रकरणी महावितरणकडून संबंधितांना कायदेशीर नोटीसा देण्यात आल्या होत्या. महावितरणच्या जठारपेठस्थित मालमत्तेवर लावलेली ''देवकमल'' हॉस्पीटलची जाहिरात हटविण्याबाबत संबंधित हॉस्पीटल प्रशासनाने महावितरणच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महावितरणने हॉस्पीटलचे डॉ.आशिष तापडीया यांच्यावर विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत, तसेच महाराष्ट्र शासनाच्या मालमत्तेच्या विदृपणास प्रतिबंध करण्याकरिता असलेले अधिनियम १९९५ अंतर्गत पोलिस स्टेशन रामदास पेठ अकोला येथे गुन्हा दाखल केला. यापुढे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया तीव्र करण्यात येत असल्याने ज्या जाहिरातदारांनी आपली प्रचार साहित्ये काढली नाही त्यांनी काढून घ्यावी असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.

Web Title: Panel on MSEDCL property; Crime against the director of Dev Kamal Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.