शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

शिर्डीच्या साईबाबा शताब्दी वर्षानिमित्त ४ फेब्रुवारीपासून विदर्भात पादुका दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 8:45 PM

अकोला : शिर्डीच्या साईबाबा शताब्दी वर्षानिमित्त संस्थानने पंचसूत्री कार्यक्रम  राबविला असून, यानिमित्त साईबाबांच्या मूळ पादुका भाविकांच्या दर्शनासाठी  देशभरात फिरविल्या जाणार आहेत. या पादुका ४ फेब्रुवारीपासून विदर्भात येत  असून, त्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम ठेवले आहेत.

ठळक मुद्देशेगाव संस्थानच्या धर्तीवर सेवाभावी राबविणार उपक्रमशिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आणि प्रख्यात बिल्डर्स सुरेश हावरे यांनी दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिर्डीच्या साईबाबा शताब्दी वर्षानिमित्त संस्थानने पंचसूत्री कार्यक्रम  राबविला असून, यानिमित्त साईबाबांच्या मूळ पादुका भाविकांच्या दर्शनासाठी  देशभरात फिरविल्या जाणार आहेत. या पादुका ४ फेब्रुवारीपासून विदर्भात येत  असून, त्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम ठेवले आहेत. अशी माहिती शिर्डीच्या साईबाबा  संस्थानचे अध्यक्ष आणि प्रख्यात बिल्डर्स सुरेश हावरे यांनी अकोल्यात आयोजित  पत्रकार परिषदेतून दिली. शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानच्या धर्तीवर  सेवाभावी उपक्रम राबविणार असल्याचेही हावरे यांनी सांगितले.साई भक्तांचा मोठा गोतावळा असून, आठ हजार मंदिरे देशात आणि ४७ मंदिरे  विदेशात आहेत. शताब्दी वर्षानिमित्त तीन हजार कोटींचा विकास आराखडा प्रस् तावित आहे. तिरुपती आणि शेगावच्या धर्तीवर शिर्डी संस्थानने आता पंचसूत्री  कार्यक्रम हाती घेतला आहे. धार्मिक, सामाजिक, प्रबोधनात्मक, सांस्कृतिक आणि  पादुका दर्शनाचा हा कार्यक्रम आहे. त्यासाठी विदर्भातही पादुका दर्शन आणि विविध  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. अमरावती येथे ४ फेब्रु., अकोला ये थे ५ फेब्रु., खामगाव येथे ६ फेब्रु. आणि शेगाव येथे ७ फेब्रुवारी रोजी पादुका  दर्शनासाठी उपलब्ध राहतील. त्यानिमित्त अकोल्यातील पंचसूत्री कार्यक्रम अपेक्षित  असल्याचेही त्यांनी सांगितले.  वर्षाला चारशे कोटींची  देणगी येत असलेल्या शिर्डी संस्थानने आता दररोज सहा हजार भाविकांची  संगणकीय नोंदणी सुरू केली आहे. सोबतच भविष्यात मेडिटेशन, सायन्स पार्क,  साई महिमांचे विविध उपक्रम प्रस्तावित आहेत, त्याची माहितीही त्यांनी येथे दिली.  राज्यात ५00 साई अँम्बुलन्स दिल्या जाणार असून, १५0 अँम्बुलन्सचे दाते झाले  आहेत. या प्रयोगासोबत पशूसांठीदेखील अँम्बुलन्स सेवा देण्याचा विचार आहे,  असेही ते म्हणालेत.

टॅग्स :saibabaसाईबाबाAkola cityअकोला शहर