आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राज्याबाहेरील परीक्षा केंद्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:24 AM2021-09-15T04:24:21+5:302021-09-15T04:24:21+5:30

अ.भा. स्तरावर आयुष मंत्रालय व नॅशनल कमिशन फाॅर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसीन(एनसीआयएसएम) द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या पाच दिवस आधी ...

Out-of-State Examination Centers for Maharashtra Students for AYUSH Post Graduate Entrance Examination! | आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राज्याबाहेरील परीक्षा केंद्र!

आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राज्याबाहेरील परीक्षा केंद्र!

googlenewsNext

अ.भा. स्तरावर आयुष मंत्रालय व नॅशनल कमिशन फाॅर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसीन(एनसीआयएसएम) द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या पाच दिवस आधी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे मिळाली. राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील केंद्रे निवडल्यानंतरही त्यांना राज्याबाहेरील मध्य प्रदेश, गुजरात येथील केंद्रे मिळाली. महाराष्ट्रातील अकोला, नागपूर, चंद्रपूर नाशिक, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील केंद्रे निवडली होती. कोरोनाचा काळ असतानाही ‘एनसीआयएसएम’ने विद्यार्थ्यांना महाराष्ट्राबाहेरील केंद्रे दिली आहे. त्यामुळे तीन दिवसांत रेल्वेचे आरक्षण मिळणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्याकडे भाड्याने टॅक्सी करून परीक्षेला जाण्याशिवाय पर्याय नाही. तेथे गेल्यानंतरही राहण्यासाठी हॉटेल बुक करावे लागणार आहे. आर्थिक क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना तर या परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यातून विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रांचा पर्याय असताना, राज्याबाहेरील परीक्षा केंद्र देणे हा अन्याय असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

//बाॅक्स//

कशासाठी घेतली जाते परीक्षा?

आयुर्वेद शाखेतील १४ विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. बीएएमएसची पदवी प्राप्त केल्यानंतर ही परीक्षा देता येते. ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर ‘एमडी’ पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना देता येते.

//काेट//

कोरोनाच्या परिस्थितीत, महाराष्ट्रातील परीक्षार्थींना, परीक्षेच्या चार दिवस आधी, दुसऱ्या राज्यात परीक्षा केंद्र देणे हे परीक्षार्थींवर अन्यायकारक आहे. परीक्षार्थींना आपल्या आवडीचे पर्यायी परीक्षा केंद्र विचारण्यात आले होते. परंतु त्या पर्याय पैकी कोणतेही परीक्षा केंद्र न देता बाहेरच्या राज्यात परीक्षार्थींना केंद्र देणे चुकीचे आहे. दुसऱ्या राज्यात जाऊन परीक्षार्थींना आर्थिक व मानसिक त्रास देणे कितपत योग्य आहे.

-डाॅ. संजय खडक्कार, सदस्य परीक्षा व मूल्यमापन मंडळ

संत गाडगेबाबा अमरावी विद्यापीठ

-------------------

विद्यार्थ्यांना राज्याबाहेर परीक्षा केंद्र मिळाली. त्यामुळे तीन दिवसांत रेल्वेचे आरक्षण कसे मिळणार? हॉल तिकिट देताना, त्यावर ॲडमिट कार्ड म्हणायला हवे. परंतु प्रोव्हीजनल ॲडमिड कार्ड म्हटले आहे. हे अनाकलनीय आहे.

-डॉ. शैलेश नावकार, रा.तो. आयुर्वेद महाविद्यालय

Web Title: Out-of-State Examination Centers for Maharashtra Students for AYUSH Post Graduate Entrance Examination!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.