शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
2
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
3
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
6
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
7
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
14
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
15
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
16
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
17
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
18
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
19
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
20
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात विहिरींचे नियमबाह्य खोदकाम

By admin | Updated: May 9, 2014 00:46 IST

३00-३५0 फूट खोलपर्यंत विंधन विहिरी खोदल्या जात आहेत.



वाशिम : जिल्हय़ात ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांतर्गत सिंचन क्षेत्रवाढीसाठी पारंपरिक विहिरी, विंधन विहिरीचे नियमबाह्य व अर्मयाद खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम करताना यापूर्वी खोदलेल्या विहिरीच्या ५00 फूट क्षेत्रात खोदकाम करू नये या शासनाच्या नियमाचे सर्रास  उल्लंघन केले जात आहे. तसेच २00 फूटपर्यंतच प्रवाही भूजल उपलब्ध असल्याने त्या खाली विंधन विहिरीचे खोदकाम करणे जलपातळी खालावण्यास कारणीभूत ठरणारे असते; परंतु या बाबीकडे दुर्लक्ष करून ३00-३५0 फूट खोलपर्यंत विंधन विहिरी खोदल्या जात आहेत.
वाशिम जिल्हय़ात एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. तीन मध्यम व ९८ लघू पाटबंधारे प्रकल्प तसेच स्थानिक स्तर व जि.प.चे काही सिंचन तलाव, गावतळी व शेततळी असली तरी सिंचन क्षेत्र  केवळ ७0 हजार हेक्टर एवढे आहे. त्यामुळे सिंचनवाढीसाठी शासनाच्या जवाहर विहीर योजना, एकलक्ष विहीर योजना, पंतप्रधान पॅकेज यासह सिंचन क्षेत्र वाढीसाठी शासनाच्या विविध विभागांच्या वतीने राबविण्यात येणार्‍या योजनांमधून पारंपरिक व विंधन विहिरींचे खोदकाम सुरू आहे. शासनाच्या विविध योजनांमध्ये विहिरीसाठी शेतकर्‍यांना अनुदान दिले जाते. या नवीन विहिरींना मान्यता देण्यासाठी सदर विहिरीच्या क्षेत्रात ५00 फूट परिसरात यापूर्वी कोणत्याही विहिरीचे खोदकाम व बांधकाम झालेले नसावे, असा नियम आहे; परंतु हा नियम धाब्यावर बसवून सर्रास विहिरी मंजूर केल्या व बांधल्या जात आहे.