शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

बँक खाते नसणा-या शेतक-यांचा निधी कोषागारातच ठेवण्याचे आदेश

By admin | Updated: January 20, 2015 23:39 IST

निधी बँकेत ठेवल्यास अपहाराचे प्रकरण समजून होणार कारवाई.

वाशिम : २0१४ च्या खरिप हंगामातील नुकसानभरपाईची रक्कम, बाधित शेतकर्‍यांच्या उपलब्ध बँक खाते माहितीनुसारच तहसीलदारांनी कोषागारातून काढावी, जास्त रक्कम काढल्यास त्यांच्याविरूद्ध अपहार झाल्याचे समजून कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे.खरिप हंगामातील शेतकर्‍यांच्या नुकसानीचा सर्वे करून महसूल विभागाने माहिती जमा केली. शासनाने नुकसानग्रस्तांसाठी रक्कम उपलब्ध करून दिली. ही रक्कम थेट बँकेत संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. काही ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची माहिती आहे, पण त्याचे बँक खाते क्रमांक उपलब्ध नाही, अशा ठिकाणी बँक खाते क्रमांक उपलब्ध नसताना संपूर्ण रक्कम तहसीलदारांनी काढली व बँकेमध्ये जमा केल्यास हा प्रकार तात्पुरता अपहार समजून संबंधित तहसीलदारांविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश शासनाने १६ जानेवारी रोजी जारी केले आहेत.दुष्काळग्रस्त, गारपीटग्रस्त व अतवृष्टीग्रस्त भागातील शेतकर्‍यांना अर्थसहाय्य म्हणून शासनातर्फे मदत जाहीर केली जाते. २0१४ च्या खरिप हंगामात कोरड्या दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर शासनाने बाधित शेतकर्‍यांसाठी नुकसानभरपाई जाहिर केलेली आहे. नुकसानभरपाईची रक्कम संबंधित जिलंना, उपलब्ध निधीनुसार पाठविण्यात आलेली आहे. या मदत वाटपात यापूर्वी काही प्रमाणात अनियमितता झाल्याचे प्रकार निदर्शनात आल्याने, शासनाने मार्गदर्शक सूचना आदेशवजा स्वरुपात जारी केल्या आहेत. शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची माहिती प्राप्त झाल्यानंतर, आवश्यक तेवढाच निधी कोषागारातून काढण्यात यावा. बँकनिहाय शेतकर्‍यांची यादी तयार करताना, बँक खाते नसलेल्या शेतकर्‍यांचा समावेश या यादीमध्ये होणार नाही, याची दक्षता राज्यातील सर्व तहसीलदारांनी घ्यावी, असे आदेश शासनाने दिले आहेत. ज्या शेतकर्‍यांजवळ बँक खाते नाहीत, त्या शेतकर्‍यांचे बँक खाते जन धन योजनेंतर्गत तातडीने उघडण्यात यावे, असेही निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत. *..तर शिस्तभंगाची कारवाईशासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन तहसीलदारांकडून होते आहे की नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आली आहे. शासन आदेशाचे उल्लंघन करणार्‍या अधिकार्‍यांवर तत्काळ शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याची शिफारस जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्त व शासनाकडे करावी लागेल. जिल्हाधिकार्‍यांच्या शिफारशीवर कसूरदार अधिकार्‍यांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट केले आहे.