शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा फळ पिकाला फटका; ७५ कोटी रुपयांवर नुकसानीची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 16:24 IST

विदर्भात १ लाख ३५ हजार हेक्टरवर संत्रा बागा आहेत

अकोला : ‘लॉकडाउन’ आणि अवकाळी पावसाचा संत्रा फळ पिकांना फटका बसला असून, जवळपास ७५ कोटी रुपयांवर नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विदर्भात १ लाख ३५ हजार हेक्टरवर संत्रा बागा आहेत. गत व यावर्षी सतत पाऊस सुरू असून, अवकाळी पावसानेही विदर्भात चांगलेच थैमान घातले आहे. या प्रतिकूल हवामानाचा जबर फटका मृग बहाराच्या संत्र्याला बसला आहे. सध्या अंबिया बहारही झाडला लागला आहे. त्याचीही वादळी पावसामुळे फळगळ सुरू आहे. या प्रतिकूल स्थितीचा सामना शेतकरी करीत असताना कोराना विषाणूने नवे संकट त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी फळबागांचे जतन केले. काही शेतकऱ्यांनी फेब्रुवारी, मार्च महिन्याच्या प्रथम आठवड्यात संत्रा झाडारू न काढला. संत्रा फळात ‘क’ जीवनसत्व असल्याने संत्र्याची मागणीही वाढली होती. शेतकºयांना चांगले दरही मिळत होते. तथापि, कोराना हे वैश्विक संकट निर्माण झाल्याने शासनाला संचारबंदीसारखा निर्णय घ्यावा लागला. परिणामी वाहतूक बंद झाल्याने शेतकºयांना वाहतूक करणे कठीण झाले. परिणामी आजमितीस शेततकºयांकडे संत्रा पडून आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी हतबल आहे.अवकाळी पाऊस आणि वाहतुकीचा काहीसा परिणाम संत्रा फळावर झाला आहे. जवळपास ५० कोटीवर संत्र्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

- सुभाष नागरे, विभागीय सहसंचालक, कृषी विभाग, अमरावती.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भagricultureशेतीFarmerशेतकरी