शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीने संत्रा पिकाचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:31 IST

विदर्भात पाऊस सुरू च असून, गारपीटही होत असल्याने संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पाऊस व गारपिटीने विदर्भातील फळवर्गीय फळ पिकांचा अंबिया बहार गळाला असून, संत्र्याचे नुकसान झाले आहे. आणखी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या स्थितीत या फळांच्या मृग व येणाºया अंबिया बहाराची काळजी घेण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे.डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भात पाऊस सुरू च असून, गारपीटही होत असल्याने संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान झाले आहे.गारपिटीमुळे झाडांच्या फांद्यांवरील आणि खोडांवरील सालीला जखमा होतात. त्यातून झांडांना संक्रमण होऊन प्रामुख्याने फायटोप्थोरा, कोलोटोत्रिकम, डिप्लोडिया, आॅनरनारियासारख्या बुरशीचा शिरकाव होऊन रोगांचा प्रसार वाढतो. पानाला गारांचा मार बसल्याने पाने फाटून गळतात. विदर्भात दोन दिवस पडलेल्या गारपिटीमुळे हे नुकसान झाले आहे. यामुळे सूर्यप्रकाशात झाडांची अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. झाडांवरील मृग बहाराच्या फळाची मोठ्या प्रमाणात फळगळ होते. अंबिया बहाराची फुले गळतात, अंबिया बहार फुटण्यास विलंब होतो. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.ढगाळ वातावरणाचा प्रतिकूल परिणामसततच्या ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे मृग बहार असलेल्या बगीचांमधील फळांवर तपकिरी कुज (ब्राऊन राट) या रोगाचे संक्रमण होऊ शकते. त्यासाठी संपूर्ण झाडावर फोसेटील २.५ ग्रॅम किंवा कॉपर आॅक्सिक्लोराइड ५० डब्ल्यूपी ३० ग्रॅम प्रतिलीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.४पावसामुळे कागदी लिंबूवरील खैºया रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे संरक्षणासाठी कॉपर आॅक्सिक्लोराइड ३० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

शेतकºयांनी ही उपाययोजना करावी!गारपिटीने मोडलेल्या फांद्या आरीच्या साहाय्याने कापून त्या भागावर १:१:१० बोर्डो पेस्ट लावावी. तर बुंध्यास १ मीटर उंचीपर्यंतही ही पेस्ट लावावी. साल फाटल्यास १ टक्का पोटॅशियम परमॅग्नेट द्रावणाने १०० ग्रॅम प्रति १० लीटर पाणी टाकून स्वच्छ पुसून जखमेवर १:१:१० प्रमाणे बोर्डो पेस्ट लावावी. गारपीटग्रस्त झाडावर कार्बेन्डाझीम १ ग्रॅम लीटर पाणी किंवा कॉपर आॅक्सिक्लोराइड ३ ग्रॅम लीटर पाणी किंवा बोर्डो मिश्रण ६०० ग्रॅम चुना अधिक ६०० ग्रॅम मोरचूद अधिक १०० लीटर पाणी याप्रमाणे बुरशीनाशकांची फवारणी करावी.

गारपीट, पाऊस ढगाळ वातावरणामुळे लिंबूवर्गीय पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याने शेतकºयांनी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे फवारणी, उपाययोजना करावी.- डॉ. दिनेश पैठणकर, डॉ. योगेश इंगळे, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

 

 

टॅग्स :AkolaअकोलाHailstormगारपीटagricultureशेतीFarmerशेतकरी