केवळ पावणेसात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

By admin | Published: December 16, 2014 01:08 AM2014-12-16T01:08:16+5:302014-12-16T01:08:16+5:30

काटेपूर्णा धरणात फक्त ३१ टक्के उपयुक्त जलसाठा

Only under 6000 hectare area under wetlands | केवळ पावणेसात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

केवळ पावणेसात हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

Next

अकोला : यंदा पाऊस कमी झाल्याने सिंचनासाठी पाणीच उपलब्ध झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचनक्षेत्र घटले असून, रब्बी हंगामातील निर्मिती सिंचन क्षमतेच्या केवळ पावणेसात हजार हेक्टर क्षेत्रातच ओलित होऊ शकले.
यंदा कमी पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वांत मोठे काटेपूर्णा धरणात ५0 टक्क्य़ांच्या आत जलसंचय झाला. आजमितीस या सिंचन प्रकल्पात केवळ ३१ टक्क्य़ांच्या जवळपास उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. या एकट्या प्रकल्पाची सिंचनक्षमता साडेआठ हजार हेक्टर आहे. तथापि, पूरक पाणीच नसल्याने यंदा या प्रकल्पातील पाणी सिंचनाला सोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा या मध्यम सिंचन प्रकल्पातील जलसाठा तर १0 टक्क्य़ांच्या आतच आल्याने या प्रकल्पातूनही यंदा सिंचनाला पाणी सोडले नाही. उर्वरित मोर्णा, निगरुणा आणि लघु पाटंबधारे प्रकल्पात जो काही जलसाठा संचयित झाला, त्या जलसाठय़ावर जिल्ह्यात ६,७२१ हेक्टर रब्बी हंगामातील क्षेत्राला सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे.
काटेपूर्णा, उमा वगळता इतर सिंचन प्रकल्पांमध्ये जलसाठा उपलब्ध असल्याने त्यामधील पाणी जिल्ह्यातील जवळपास पावणेसात हजार हेक्टरवरील रब्बी हंगामातील पिकांना सोडण्यात आले असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.

Web Title: Only under 6000 hectare area under wetlands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.