शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

अवघ्या ५०० रुपयात कुणालाही होता येते सावकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 3:18 PM

अकोला : अवघ्या ५२३ रुपयांत कुणालाही सावकार होता येते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे बहुतांश सावकारांनी सावकारीच्या अवैध धंद्याला नियमानुकूल केल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देकार्यक्षेत्राबाहेर कर्ज वाटप करणाºया जिल्ह्यातील १०६ सावकारांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केवळ ५२३ रुपयांत मिळतो व याचाच बेमालूम फायदा घेऊन परवानाधारक सावकारांनी वारेमाप व्याजदराने व नियमाला बगल देत कर्ज वाटपाचा गोरखधंदा सुरू केला आहे. हा सावकारी व्यवसाय कुणालाही करणे सहज शक्य असल्याने या व्यवसायात अवैध प्रवृत्ती वाढत असल्याचे उपनिबंधकांनी केलेल्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

अकोला : शहरात सराफा व्यवसाय थाटल्यानंतर सावकारीचा परवाना घेऊन सोने गहाण ठेवून कार्यक्षेत्राबाहेर कर्ज वाटप करणाºया जिल्ह्यातील १०६ सावकारांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेनंतर ‘सावकारी’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या पृष्ठभूमीवर सावकारीचा परवाना कसा मिळतो, याचा मागोवा घेतला असता, अवघ्या ५२३ रुपयांत कुणालाही सावकार होता येते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे बहुतांश सावकारांनी सावकारीच्या अवैध धंद्याला नियमानुकूल केल्याचे वास्तव आहे.राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ सावकारांची कर्ज व त्यांच्यापासून वसुलीसाठी लावलेला तगादा हेच असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सावकारी कर्जातून शेतकºयांची मुक्तता व्हावी, यासाठी राज्य शासनाने १० एप्रिल २०१५ रोजी शेतकºयांचे सावकारी कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सर्वांचे मूळ असलेला सावकारी परवाना सहकार विभागाद्वारा केवळ ५२३ रुपयांत मिळतो व याचाच बेमालूम फायदा घेऊन परवानाधारक सावकारांनी वारेमाप व्याजदराने व नियमाला बगल देत कर्ज वाटपाचा गोरखधंदा सुरू केला आहे. राष्टÑीयीकृत बँका पीक कर्ज वाटपात संथ आहेत, सरकारला विकलेल्या मालाचे पैसेही वेळेवर मिळत नाहीत, अशा स्थिती बहुतांश शेतकºयांना सावकाराची पायरी चढण्याशिवाय गत्यंतर नसते. त्यामुळे हे सावकार शेतकºयांच्या अगतिकतेचा फायदा घेतात. शेतकºयांचीही अडचण असल्यामुळे ते तक्रारही करू शकत नाही. परिणामी वारेमाप व्याजाचे वाढलेल कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत शेतकºयांचे शोषण होते. हा सावकारी व्यवसाय कुणालाही करणे सहज शक्य असल्याने या व्यवसायात अवैध प्रवृत्ती वाढत असल्याचे उपनिबंधकांनी केलेल्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

असा मिळतो सावकारीचा परवानासंबंधिताला ‘आपले सहकार’ या पोर्टलवर आॅनलाइन नोंदणी करून ५२३ रुपये भरावे लागतात. एआरच्या समन्सनंतर पोलिसांकडून चारित्र्याचा दाखला, पैशांचा अधिकृत स्रोतांची माहिती, आयटी रिटर्न्स व तो व्यक्ती सहकारी सोसायटी व पतसंस्थेचा सभासद नसल्याचा दाखला, शपथपत्र, याशिवाय रहिवासी दाखल, टॅक्स पावती द्यावी लागते. नंतरच एआरचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे येतो व त्याला परवाना दिला जातो. दुसऱ्या वर्षी नूतनीकरणासाठी अर्ज भरावा लागतो व परवाना मुदतीत त्याने वापरलेल्या कमाल भांडवलाच्या एक टक्का किंवा ५० हजार रुपये तपासणी शुल्काचा भरणा करून परवान्याचे नूतनीकरण डीडीआर करतात.

जिल्हा उपनिबंधकाच्या कारवाईने सावकार हादरले!सावकारांनी त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर कर्ज वाटपाच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी करून त्यातील तथ्य तपासले व कारवाईचा बडगा उगारला. जिल्ह्यात तब्बल १०६ सावकारांनी सावकारी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईमुळे सध्या सावकार हादरले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी