शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
2
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
3
शौचालयात गेलला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
4
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
5
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
6
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
7
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
8
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
9
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
10
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
11
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
12
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
13
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
14
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
15
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत
16
श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस…
17
पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये
18
बॉलिवूड अभिनेत्याला SBI कडून मिळतात दरमहा १८ लाख ९० हजार रुपये, काय केलाय जुगाड?
19
J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश
20
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!

वऱ्हाडात आता केवळ २१ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 13:58 IST

अकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणं मिळून केवळ २१.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची लाइफलाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आठ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ८.९ टक्के, मोर्णा मध्यम प्रकल्पात ११.६३, निर्गुणा ७.९०, उमा धरणात शून्य तर दगडपारवा धरणात ८.९ टक्के जलसाठा आहे.बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात १६.६२ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणात शून्य टक्के तर पेनटाक ळी धरणात १२.८७ टक्केच जलसाठा आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १६.८० टक्के, सोनलमध्ये शून्य, तर एकबुर्जी प्रकल्पात ११.३६ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे.

अकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) सर्व धरणं मिळून केवळ २१.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची लाइफलाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर आठ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने एवढे पाणी येत्या तीन महिने आठ लाख अकोलेकरांची तहान भागवेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातही प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मैलोगणती भटकंती सुरू आहे; पण प्रशासनाने टंचाई निवारणार्थ अद्याप कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने जलसंकट अधिक गडद झाले.वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती येथे सातत्याने पावसाची अनिश्चितता असते; पण गतवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील धरणे शंभर टक्केच्या आतच होती. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा मोठे धरण आहे; पण हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नव्हते. आजमितीस या धरणात ८.९ टक्के जलसाठा आहे. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात ११.६३, निर्गुणा ७.९०, उमा धरणात शून्य तर दगडपारवामध्ये शून्य टक्के जलसाठा आहे, तर तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणात ७२.८० टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती डामाडोल आहे. या जिल्ह्यातील नळगंगा धरणात १६.६२ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणात शून्य टक्के तर पेनटाक ळी धरणात १२.८७ टक्केच जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ३६.६०, मसमध्ये शून्य टक्के, कोराडी २.६५, पलढग १४.९१, मन १२.६५, तोरणा ८.६७ टक्के, तर उतावळी धरणात १२.५३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात १६.८० टक्के, सोनलमध्ये शून्य, तर एकबुर्जी प्रकल्पात ११.३६ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे.दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील अपर वर्धा या मोठ्या प्रकल्पात ४३.०९ टक्के जलसाठा आहे. शहानूरमध्ये ४८.४४, चंद्रभागा ४१.४८ टक्के, पूर्णा १५.३३, तर सपन या धरणात बऱ्यापैकी ४८.१६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात १५.६४ टक्के, अरुणावतीमध्ये ८.२७, बेंबळा धरणात १४.०५, लोअर पूसमध्ये २९.७२, सायखेडा ४९.४१, गोकी ८.१७, वाघाडी १०.४१, बोरगाव ७.७२ टक्के, नवरगाव धरणात २३.७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

- २१ टक्क्यात लघू प्रकल्पाचा जलसाठापश्चिम विदर्भात पाटबंधारे विभागाच्या अख्त्यारित ४८४ प्रकल्पांचे नियोजन असून, यात नऊ मोठे, २३ मध्यम व ४५२ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पाचा एकूण जलसाठा २१.३७ टक्के आहे. लघू प्रकल्पातील जलसाठा सहसा पिण्यासाठी वापरतच नसल्याने २१.३७ टक्के जलसाठ्यातून लघू प्रकल्पाचा १२.५२ टक्के जलसाठा वजा केल्यास अत्यंत अल्प जलसाठ आजमितीस वºहाडात शिल्लक आहे. या साठ्यात येणारी तीन महिने काढावी लागणार आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाbuldhanaबुलडाणाwashimवाशिमKatepurna Damकाटेपूर्णा धरणnalganga damनळगंगा धरण