आॅनलाइन बदल्या; शिक्षकांची आयुक्तांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 12:49 IST2018-07-20T12:46:55+5:302018-07-20T12:49:24+5:30

अकोला : शासनाने केलेल्या आॅनलाइन बदल्यांमध्ये अन्याय झाल्याच्या तक्रारी करण्यासाठी अमरावती विभागातील एक हजारांपेक्षाही अधिक शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली.

 Online transfers; Teacher appeal Commissioner | आॅनलाइन बदल्या; शिक्षकांची आयुक्तांकडे धाव

आॅनलाइन बदल्या; शिक्षकांची आयुक्तांकडे धाव

ठळक मुद्देआॅनलाइन बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाविरोधात शिक्षकांनी प्रथम विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. त्यासाठी तक्रारी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठवण्यात आल्या.मात्र, त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला नाही.

- सदानंद सिरसाट
अकोला : शासनाने केलेल्या आॅनलाइन बदल्यांमध्ये अन्याय झाल्याच्या तक्रारी करण्यासाठी अमरावती विभागातील एक हजारांपेक्षाही अधिक शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. त्यावर वेळापत्रक ठरवून देत १९ ते २१ जुलैदरम्यान सुनावणीचा स्वतंत्र कार्यक्रमच आयुक्तांनी लावला. त्यासाठी पाचही जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाºयांना हजर राहण्याचे बजावले आहे.
आॅनलाइन बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाविरोधात शिक्षकांनी प्रथम विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. दाखल तक्रारीनुसार त्यावर आयुक्त निर्णय देणार आहेत. त्यासाठी तक्रारी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठवण्यात आल्या. मात्र, त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला नाही. त्यामुळे तक्रारी तशाच प्रलंबित आहेत. अमरावती विभागातील सर्व तक्रारींचा एकाचवेळी निपटारा करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना बुधवार, १८ जुलै रोजी पत्र देत अहवाल मागवला. सोबतच तक्रारींची सुनावणी करण्यासाठी जिल्ह्यातील तक्रारकर्त्या शिक्षकांना उपस्थित राहण्याचा निरोप देण्याचेही बजावले.
अकोला जिल्ह्यातील १५० पेक्षाही अधिक शिक्षकांनी बदलीसंदर्भात तक्रारी केल्या आहेत. विभागीय आयुक्त त्या शिक्षकांची तीन दिवस विभागून सुनावणी घेणार आहेत. महसूल उपायुक्तांच्या कक्षात ही सुनावणी होत आहे. १९, २०, २१ जुलै रोजी तक्रारकर्त्या शिक्षकांचे ठरावीक संख्येत म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे.
  शिस्तभंगाची कारवाई
सुनावणी प्रक्रियेत शिक्षकांसह जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, संबंधित कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
  न्यायालयात दाखल करणार प्रतिज्ञापत्र
शासनाने केलेल्या आॅनलाइन बदली प्रक्रियेतून अन्याय झाल्याच्या याचिका राज्यातील उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्या प्रकरणांची सुनावणीही न्यायालयात एकत्रितपणे होत आहे. शिक्षकांच्या तक्रारीनुसार म्हणणे ऐकून घेऊन त्यानुसार न्यायालयात शासनाची बाजू मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल. त्यासाठी ही सुनावणी घेतली जात आहे.
अकोट तालुक्यातील ३२ शिक्षकांच्या तक्रारी
अकोला जिल्ह्यात १५० पेक्षाही अधिक शिक्षकांमध्ये अकोटमधील ३२ शिक्षकांनी एकत्रित तक्रार केली आहे. सविता तुकाराम ढाले अधिक ३२ अन्यायग्रस्त शिक्षकांची नावे त्यामध्ये आहेत, तर इतरांनी वैयक्तिक तक्रारी नोंदवल्या आहेत.

 

Web Title:  Online transfers; Teacher appeal Commissioner