शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

वाळूघाटांच्या लिलावासाठी  रविवारी  'ऑनलाइन 'जनसुनावणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 16:54 IST

रविवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात 'ऑनलाइन' पद्धतीने जनसुनावणी घेण्यात येणार आहे.

अकोला : जिल्'ातील प्रस्तावित १४ वाळूघाटांच्या लिलावासाठी रविवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात 'ऑनलाइन' पद्धतीने जनसुनावणी घेण्यात येणार आहे. या जनसुनावणीत 'झूम अ‍ॅप ' चा वापर करण्यात येणार आहे.राज्यातील नवीन वाळू धोरण गत ३ सप्टेंबर २०१९ रोजी निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रस्तावित वाळूघाटांच्या लिलावासाठी जनसुनावणी घेणे आवश्यक आहे. दरम्यान , कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू असलेल्या 'लॉकडाऊन' च्या पृष्ठभूमीवर वाळू घाटांच्या लिलावासाठी 'झूम अ‍ॅप'चा वापर करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत ऑनलाइन जनसुनावणी घेऊन , ई-मेल द्वारे नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्'ातील प्रस्तावित १४ वाळू घाटांच्या लिलावासाठी ७ जून रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अपर जिल्हाधिकारी यांच्या कक्षात ऑनलाइन  पद्धतीने जनसुनावणी घेण्यात येणार आहे. झूम अ‍ॅप द्वारे घेण्यात येत असलेल्या या जनसुनावणीत जिल्हाधिकारी , जिल्हा खनिकर्म अधिकारी , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आणि जिल्'ातील नागरिक सहभागी होणार आहेत. या जनसुनावणीत सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या हरकती व सूचना ई-मेल द्वारे स्वीकारण्यात येणार आहेत.जनसुनावणीची व्यवस्था जिल्हा खनिकर्म विभागामार्फत पूर्ण करण्यात आली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळू