शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
7
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
8
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
9
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
11
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
12
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
13
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
14
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
15
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
16
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
17
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
18
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
19
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
20
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
Daily Top 2Weekly Top 5

दलालमुक्तीसाठी ‘एक खिडकी योजना’

By admin | Updated: February 11, 2015 00:57 IST

आरटीओत सामान्यांना मार्गदर्शन; अर्जातील त्रुटीही काढून देणार.

हर्षनंदन वाघ /बुलडाणा: प्रादेशिक परिवहन कार्यालय दलालमुक्त करण्यासाठी राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात एक खिडकी योजना मंगळवारपासून सुरू करण्यात आली. या योजनें तर्गत नागरिकांना कार्यालयीन कामासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असून, त्यांचे अर्ज तपासणे, त्यातील त्रुटी काढून देणे आदी कामं कर्मचार्‍यांकडून केली जातील.दलालांच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार आणि सर्वसामान्यांची लूट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालये दलालमुक्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशामुळे कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर कर्मचार्‍यांना उभे करून, येणार्‍या नागरिकांची आधी चौकशी केली की, मगच त्यांना कार्यालयात सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ती तेवढी सोयीस्कर नसल्याचे स्पष्ट झाले. यावर पर्याय म्हणून परिवहन आयुक्तांनी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना सुरू करण्याचे आदेश ३ फेब्रुवारी रोजी दिले. या आदेशान्वये १0 फेब्रुवारीपासून एक खिडकी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत स्वीकारलेल्या अर्जाची तपासणी करून शिपायामार्फत त्या-त्या विभागातील संबंधित अधिकार्‍याकडे तो अर्ज पोहचविण्यात येणार आहे. त्या ठिकाणी कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर तो अर्ज वरिष्ठ अधिकार्‍यांकडे दिला जाईल. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार, तो अर्ज वितरण कक्षाकडे देण्यात येईल. त्यानंतर वितरण खिडकीतून संबंधित नागरिकांना अर्जाचे वितरण केले जाणार आहे. बुलडाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात एका ठिकाणी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या. एक खिडकी योजनेमुळे शासनाच्या विविध विभागांत कामाचे नियोजन करण्यात आले असून, अनेकांना मदत होत आहे; मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू झालेल्या एक खिडकी योजनेस नागरिकांचा प्रतिसाद मिळतो का, नागरिकांना किती प्रमाणात फायदा होतो, कर्मचारी सहकार्य करतील काय, हे येणार्‍या काळात स्पष्ट होणार आहे. परिवहन आयुक्तांच्या आदेशान्वये एक खिडकी योजनेची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली आहे. ही योजना सामान्य नागरिकांच्या सोयीची असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी सांगीतले.