भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 19:25 IST2020-12-16T19:25:42+5:302020-12-16T19:25:50+5:30
Accident News ईश्र्वर जोशी (३०, रा. गंगापूर, जि. जळगाव खांदेश) असे मृताचे नाव आहे.

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव मालवाहू ट्रकच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी १६ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान घडली, ईश्र्वर जोशी (३०, रा. गंगापूर, जि. जळगाव खांदेश) असे मृताचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजूकडून अकोलाकडे जाणारा दुचाकीस्वार ईश्र्वर पंढरीनाथ जोशी (३०) रा.गंगापूर जि.जळगाव खान्देश, हे दुचाकी क्रंमाक एम.एच.१९ डीसी ६५३३ ने जात होते. दरम्यान, अकोलाकडून बोरगाव मंजूकडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक एमएच ४० बीएल ५२६३ जात भरधाव वेगाने जात असता बोरगावमंजू येथील शाॅ मिलजवळ ट्रकने दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार ईश्वर जोशी हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनील सोळंकेसह पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक कानडे, योगेश काटकर, शे. फईम शे. चाॅद, संजय इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. ट्रकसह चालकास ताब्यात घेतले असून, पुढील तपास बोरगावमंजू पोलीस करीत आहेत. वृत्त लिहिस्तोर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.