विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:21 IST2017-08-22T00:21:02+5:302017-08-22T00:21:02+5:30

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
अकोला : म्हातोडी येथील एका युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी अकोट फैल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
म्हातोडी येथील रहिवासी मोहित श्रीकृष्ण भगत हे घरात असताना कपडे घेण्यासाठी ते भिंतीजवळ गेले. तिथे त्यांना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतरही त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी अकोट फैल पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.