शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

Omicron Variant: ओमायक्रॉनने चिंता वाढवली; अकोल्यात जमावबंदी लागू, रॅली, मोर्चा अन् आंदोलनाला बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 09:13 IST

कोरोना विषाणू संसर्गाची नवीन प्रजाती (व्हेरिएंट) ‘ओमायक्रॉन’ आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

अकोला: कर्नाटक आणि गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. मुंबईजवळच्या डोंबिवली येथील ३३ वर्षीय तरुणाला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. या रूग्णाला सौम्य लक्षणे असून जनतेने घाबरुन जावू नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. गुजरातच्या जामनगर येथे एका ७२ वर्षीय पुरुषाला हा संसर्ग झाला. ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्यांची संख्या आता देशात चार झाली आहे. डाेंबिवलीत आढळलेला रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून दुबई आणि दिल्लीमार्गे २३ नोव्हेंबरला मुंबईत दाखल झाला.

कोरोना विषाणू संसर्गाची नवीन प्रजाती (व्हेरिएंट) ‘ओमायक्रॉन’ आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ‘ओमायक्रॉन’ संसर्गाचा जिल्ह्यात संभाव्य धोका वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये जिल्ह्यात ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजतापासून पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जमावबंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरोरा यांनी ४ डिसेंबर रोजी जारी केला.

अकोला जिल्ह्यातील जमावबंदीच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या रॅली, धरणे, आंदोलन, मोर्चा इत्यादींचे आयोजन करता येणार नाही, तसेच जमावबंदीच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे काम नियमित सुरू राहणार असून, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बूस्टर डोस गरजेचा-

संसर्गक्षमता खूप जास्त असल्याने  काेराेनाचा ओमायक्राॅन व्हेरिएंट डेल्टाची जागा घेऊ शकताे. येणाऱ्या काळात ओमायक्राॅनचेच रुग्ण माेठ्या प्रमाणात आढळतील. मात्र, वेगळ्या लसीची कदाचित गरज भासणार नाही, असे जागतिक आराेग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डाॅ. साैम्या स्वामिनाथन यांनी सांगितले. डाॅ. स्वामिनाथन म्हणाल्या की, नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेतून उगम पावला, याबाबतही शंकेला वाव आहे. यापूर्वी काेराेना संसर्गामुळे निर्माण झालेल्या राेगप्रतिकारशक्तीला ओमायक्राॅन चकवू शकताे. मात्र,  लसी त्याच्याविरुद्ध प्रभावी ठरत असल्याचे आतापर्यंतच्या संसर्गावरून आढळले आहे. संसर्ग झालेल्यांना गंभीर आजार हाेत नाही. कदाचित बूस्टर डाेसची गरज भासू शकते, असे त्या म्हणाल्या. 

गुजरातच्या जामनगरमध्ये आणखी एक बाधित -

गुजरातमध्ये संसर्ग झालेला नागरिक झिम्बाब्वे येथून भारतात परतला हाेता. विमानतळावर तपासणीदरम्यान त्याला काेराेना झाल्याचे आढळून आले. त्यानंतर अहमदाबाद येथे जिनाेम सिक्वेन्सिंग करण्यात आले. त्यातून ओमायक्राॅनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची ओळख पटविण्यात येत आहे. यापूर्वी कर्नाटकमध्ये ६६ आणि ४६ वर्षांच्या दाेन रुग्णांना ओमायक्राॅनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले हाेते. दाेघांचेही संपूर्ण लसीकरण झाले हाेते, हे विशेष.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनAkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या