वृद्ध इसमाची आत्महत्या
By Admin | Updated: May 30, 2014 20:08 IST2014-05-30T20:06:01+5:302014-05-30T20:08:59+5:30
तेल्हारा तालुक्यातील वांगरगाव येथील ६० वर्षीय इसमाने राहत्या घरी दुपट्टय़ाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

वृद्ध इसमाची आत्महत्या
तेल्हारा : तालुक्यातील वांगरगाव येथील महादेव श्रीपत दामोदर या ६० वर्षीय इसमाने ३० मे रोजी दुपारी एक वाजता राहत्या घरी दुपट्टय़ाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. रवींद्र गोपाल दामोदर यांच्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.