ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष जूनअखेरपर्यंत धावणार!

By Atul.jaiswal | Updated: April 20, 2024 15:07 IST2024-04-20T15:07:23+5:302024-04-20T15:07:41+5:30

या गाडीला अकोला येथे थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.

Okha-Madurai weekly special railway to run till end of June! | ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष जूनअखेरपर्यंत धावणार!

ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष जूनअखेरपर्यंत धावणार!

अकोला : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने ओखा-मदुरै-ओखा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ही साप्ताहिक रेल्वे आता २८ जूनपर्यंत धावणार आहे. या गाडीला अकोला येथे थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे.

पश्चिम रेल्वेतील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, २५ मार्च २०२४ पर्यंत अधिसूचित असलेली ०९५२० ओखा-मदुरै साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २४ जून २०२४ पर्यंत दर सोमवारी २२:०० वाजता प्रस्थान स्थानकावरून रवाना होऊन चौथ्या दिवशी मदुरै स्थानकावर ११:४५ वाजता पोहोचणार आहे. 

२९ मार्च २०२४ पर्यंत अधिसूचित असलेली ०९५१९ मदुरै-ओखा साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस २८ जून २०२४ पर्यंत दर शुक्रवारी १:१५ वाजता स्थानकावरून रवाना होऊन तिसऱ्या दिवशी १०:२० वाजता ओखा स्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीच्या अप व डाऊन मार्गावर प्रत्येकी चार अशा एकूण आठ फेऱ्या होणार आहेत.

Web Title: Okha-Madurai weekly special railway to run till end of June!

टॅग्स :railwayरेल्वे