शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तेलबिया उत्पादकांसाठी ‘तेलबिया लघु अभियान’

By admin | Updated: June 12, 2015 17:40 IST

अल्पभूधारक शेतकर्‍यांना मिळणार अभियानाचा लाभ.

प्रवीण खेते / अकोला : राष्ट्रीय तेलबिया आणि तेलताड अभियानांतर्गत राज्यात तेलबिया आणि वृक्ष आधारित ह्यतेलबिया लघु अभियानह्ण राबविण्यात येणार आहे. राज्यात विविधस्तरावर हे अभियान राबविण्यात येणार असल्याने अल्पभूधारक तेलबिया उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे गतवर्षी सोयाबीन, सूर्यफूल, करडई या तेलबिया उत्पादनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्याचा परिणाम यंदा तेलबिया उत्पादनावर होणार आहे. अशा स्थितीत तेलबिया उत्पादन स्थिर राहावे, या अनुषंगाने २0१५-१६ या आर्थिक वर्षात राज्यात ह्यतेलबिया लघु अभियानह्ण राबविण्यात येणार आहे. हे अभियान केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय तेलबिया आणि तेलताड अभियानांतर्गत राबविण्यात येत असून, राज्यातील ह्यकृषी उन्नती योजनाह्ण हा या योजनेचाच एक भाग आहे. या लघु अभियानामध्ये तेलबियांसाठी एक आणि वृक्ष आधारित तेलबियांसाठी तीन या प्रकारे लघु अभियान राबविण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत या लघु अभियानासाठी ४८ कोटी ६९ लाख ६६ हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. या लघु अभियानांतर्गत राज्यातील अल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकरी तसेच अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकर्‍यांना अनुदान मिळेल. यानुसार शेतकर्‍यांना तेलबिया उत्पादनासाठी बियाणे, कीटकनाशके, सल्फर, गंधके, जिवाणू संवर्धने आदि महत्त्वाचे घटक पुरविले जाणार आहेत. राज्यात राबविण्यात येणार्‍या या अभियानामुळे तेलबिया उत्पादनाला संरक्षण मिळणार असून, उत्पादनवाढीसही मदत होईल.

*असे राबविण्यात येणार लघु अभियान

   महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालयाचे सहायक संचालक यांच्या मार्गदर्शनात राज्यस्तरावर तेलबिया लघु अभियान राबविण्यात येणार आहे. विभागीय स्तरावर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी, जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी आणि तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात हे अभियान राबविण्यात येणार आहे.