युवतीचा विनयभंग करणाऱ्याविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 16:30 IST2019-12-16T16:30:24+5:302019-12-16T16:30:32+5:30

युवकाविरुध्द खदान पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मयुर भगत असे आरोपीचे नाव आहे.

Offense against youth who molested a girl | युवतीचा विनयभंग करणाऱ्याविरुध्द गुन्हा

युवतीचा विनयभंग करणाऱ्याविरुध्द गुन्हा

अकोला - खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर येथील भांडे कॉलेजवळ एका युवतीचा विनयभंग करणाºया युवकाविरुध्द खदान पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मयुर भगत असे आरोपीचे नाव आहे.
मलकापुर मधील एक युवती घरासमोर उभी असतांना मयुर देवीदास भगत याने तीला भ्रमनध्वनीवर मेसेज करून घर सोडून पळून जाण्याचे म्हटले. १३ डिसेंबर रोजी हा मेसेजे केल्यानंतर १५ डिसेंबरच्या पहाटे सहा वाजता हा युवक युवतीच्या घरासमोर उभा राहीला. त्यानंतर युवती घरातून बाहेर कामासाठी येताच हात धरून जबरदस्तीने एका गॅरेजजवळ घेउन गेला. त्यानंतर या युवतीला गॅरेजमध्ये ठेवून बाहेरून दरवाजा बंद केला व निघून गेला. सदर युवती तीन ते चार तास याच ठिकाणी होती. गॅरेज उघडल्यानंतर युवतीची सुटका झाली. त्यानंतर तीने खदान पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी मयुर देवीदास भगत याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम 354 354(अ)354(ड)342,34 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास खदान पोलिस करीत आहेत.

 

Web Title: Offense against youth who molested a girl