रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 18:16 IST2019-01-28T18:16:45+5:302019-01-28T18:16:53+5:30

अकोला - रेल्वेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणूण कार्यरत असलेल्या प्रकाश बोदडे यांना जाती पाहून काम दिल्यामुळे तसेच नियमांचा भंग करीत त्यांचा छळ केल्यामुळे रेल्वेच्या सीनीयर डीएन कॉर्डीनेशन डी. डी. नागपुरे, रेलपथ निरीक्षक निरंजन रवाणी आणि कनीष्ठ अभियंता आशुतोष यादव या तिघांविरुध्द अकोला जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Offence registerd against three railway officials | रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हा

रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हा

अकोला - रेल्वेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणूण कार्यरत असलेल्या प्रकाश बोदडे यांना जाती पाहून काम दिल्यामुळे तसेच नियमांचा भंग करीत त्यांचा छळ केल्यामुळे रेल्वेच्या सीनीयर डीएन कॉर्डीनेशन डी. डी. नागपुरे, रेलपथ निरीक्षक निरंजन रवाणी आणि कनीष्ठ अभियंता आशुतोष यादव या तिघांविरुध्द अकोला जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश राहुलकुमार बोदडे यांना वडीलांच्या जागेवर रेल्वेच्या लार्जेस योजनेतंर्गत रेल्वेमध्ये ट्रॅकमॅन म्हणूण २६ फेब्रुवारी २०१४ रोजी आकोटे येथे नियुक्ती मिळाली होती. त्यानंतर त्यांना अकोला रेल्वे यार्ड क्रमांक १६ मध्ये कार्यरत होण्याचे आदेश देण्यात आला होता. मात्र दरम्यान सिनीयर सेक्शन इंजीनीअर निरंजन रवाणा याने आॅगस्ट २०१६ मध्ये प्रकाश बोदडे यांना साफसफाई, नालीसफाई, ट्रॅकवरील साफसफाईचे काम दिले होते. रेल्वेच्या नियमानुसार लार्जेय योजनेतंर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाºयास घराजवळ असलेल्या कार्यालयात काम देणे बंधनकारक आहे. मात्र असे असतांनाही केवळ खालच्या जातीतील असल्याने सीनीअर डीएन कॉर्डीनेशन मध्ये रेल्वे नांदेडचे डी. डी. नागपूरे यांनी नियमांचा भंग करीत बोदडे यांची १८ आॅगस्ट २०१७ रोजी पुर्णा येथे बदली केली. नियम डावलुन बदली केल्यामूळे बोदडे हे रुजु झाले नाहीत. त्यानंतर २३ आॅगस्ट २०१८ रोजी बोदडे यांची पुन्हा औरंगाबाद येथील लासुर येथे बदली करण्यात आली. मात्र या बदलीची माहिती बोदडे यांच्याजवळून दडविण्याचे काम निरंजन रवाणा यांनी केले. त्यानंतर हजेरीपत्रक २६ मार्च २०१८ पासून बंद करून बोदडे यांना कार्यमूक्त करण्याचे पत्र लासुर येथे पाठवीले. या विरोधात बोदडे हे कॅटमध्ये गेले असता त्यांना स्थगनादेश मिळाला. मात्र त्यानंतरही कनीष्ठ अभियंता आशुतोष यादव याने आदेशाकडे कानाडोळा करीत बोदडे यांना कार्यमुक्त केले. यासोबतच सदरची फाईलही कार्यालातून गायब केली. प्रकाश बोदडे यांचा मानसीक छळ करीत त्यांचे वेतन आणि बोनस रोखण्यासाठी सदर अधिकाºयांनी प्रताप केल्याची तक्रार जीआरपी पोलिसात केली. यावरुन अकोला जीआरपीने सीनीयर डीएन कॉर्डीनेशन डी. डी. नागपुरे, रेलपथ निरीक्षक निरंजन रवाणी आणि कनीष्ठ अभियंता आशुतोष यादव या तिघांविरुध्द अ‍ॅट्रासीटी अ‍ॅक्टच्या कलम ३(१)(९), ३ (१०) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Offence registerd against three railway officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.