'ओ सेठ....विज पुरवठा दिला थेट..' ; सोशल मिडियावर गाजतोय व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 06:01 PM2021-10-04T18:01:02+5:302021-10-04T18:08:43+5:30

Akot News : अकोट कला मंचने बनवलेला "ओ सेठ....विज पुरवठा दिला थेट..आमचा जनमित्र लय आहे ग्रेट!" या गाण्याचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मिडिया वर धुमाकूळ घालत आहे.

'O Seth ....; The video is circulating on social media | 'ओ सेठ....विज पुरवठा दिला थेट..' ; सोशल मिडियावर गाजतोय व्हिडिओ

'ओ सेठ....विज पुरवठा दिला थेट..' ; सोशल मिडियावर गाजतोय व्हिडिओ

Next

अकोट: ज्या ग्राहकांना वारंवार सूचना करूनही आतापर्यंत थकलेले वीज बिल  भरले नाही. त्यामुळे विज बिल वसुली जनजागृती करीता महावितरणचे कामगिरीचा फंडा चांगला गाजत आहे.  अकोट कला मंचने बनवलेला "ओ सेठ....विज पुरवठा दिला थेट..आमचा जनमित्र लय आहे ग्रेट!" या गाण्याचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मिडिया वर धुमाकूळ घालत आहे.
अकोट येथील महावितरणचे कार्यालयात गांधी जयंती साजरी करीत या जनजागृती व्हिडीओचे लाईव्ह विमोचन प्रबोधनकार, सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज व उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महावितरणचे उपविभागीय अभियंता गोपाल अग्रवाल, सहाय्यक अभियंता अरुण जाधव, अशोकसेठ अढीया, महेंद्र सोनोने, आतंरराष्ट्रीय गिर्यारोहक धिरज कळसाईत, राजेश सांळुके, विजय बेदरकर, तसेच महावितरणचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाच्या काळात आँक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला पण विज पुरवठाची अविरत सेवा दिली. ग्राहकांचा चालु बिलसह थकबाकीदार ग्राहकांचा विज पुरवठा खंडित केल्या जात आहे. दरम्यान खंडित केलेली विज बिल भरणा झाल्यावरही जोडणी शुल्क घेणे नियमानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे पुन्हा जोडणी शुल्क टाळता यावे,विज बिल भरावे याकरीता सर्व अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान विज बिल वसुली बाबत ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे तसेच महावितरणची कामगिरीची माहीती विशद करीत ,विज बिल भरणा केंद्रासह इतर लाईव्ह व्हिडीओ सामाजिक जनजागृती म्हणून अकोट कला मंचने प्रस्तुत केला आहे. या व्हिडीओ मधील काल्पनिक पात्र ग्राहक सेठ व तयार केलेले गाण सोशल मिडिया वर धुमाकूळ घालत आहे. सामाजिक जनजागृती म्हणून  महावितरण कर्मचारी योगेश वाकोडे यांनी व्हिडीओची निर्मिती केली. तर अरुण दावले यांनी गित लिहले असुन महेंद्र सोनोने यानी गित गायिले आहे. मार्गदर्शन विजय शिंदे यांनी केले असुन सेठ ची भुमिका अशोक अढीया यांनी पार पाडली आहे. तर महावितरणचे अधिक्षक अभियता पवन कुमार कछोट, कार्यकारी अभियंता अनिल उईके, उपविभागीय अभियंता गोपाल अग्रवाल तसेच अधिकारी- कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Web Title: 'O Seth ....; The video is circulating on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.