पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही!

By Admin | Updated: January 28, 2017 01:47 IST2017-01-28T01:47:05+5:302017-01-28T01:47:05+5:30

अकोला मनपा निवडणूक; उमेदवारांनी घेतली अमावस्येची धास्ती

No nomination form for the first day! | पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही!

पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही!

अकोला, दि. २७- महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवार (२७ जानेवारी)पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. शहरात झोननिहाय गठित केलेल्या पाचही निवडणूक कार्यालयांमध्ये पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नसल्याची माहिती आहे. शुक्रवारी अमावस्या असल्याची धास्ती घेत इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केला नसल्याची चर्चा शहरात रंगली होती.
महापालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी प्रशासनदेखील सरसावल्याचे चित्र आहे. मनपाच्या निवडणूक विभागाकडून शहरातील पाच ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. क्षेत्रीय कार्यालयनिहाय ठरवून दिलेल्या प्रभागांमधून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी यंदा प्रथमच उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ती निवडणूक कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर करावी लागेल. यावेळी आवश्यक दस्तावेजांची पूर्तता (स्वाक्षांकित प्रती) करणे क्रमप्राप्त आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा लागणार असल्यामुळे उमेदवारांची धांदल उडण्याची शक्यता पाहता शुक्रवारी काही प्रमाणात का होईना, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे उमेदवारी अर्ज दाखल होतील, अशी अपेक्षा होती. दिवसभरातून पाच कार्यालयांमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल नसल्याचे समोर आले.
भाऊ अनामत रक्कम किती रे?
निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यापूर्वी महापालिकेकडे अनामत रक्कम जमा करावी लागते. अनेकांवर ह्यडिपॉझिटह्ण जप्त होण्याची वेळ येते. उमेदवारी अर्जासाठी किती अनामत रक्कम जमा करावी लागेल, यावर इच्छुकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच हजार रुपये तर आरक्षित जागेवरील उमेदवाराला अडीच हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे.
पाच कार्यालये निरंक
२७ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. याकरिता सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंतचा अवधी निश्‍चित करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी पाचपैकी एकाही निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. त्यामुळे कार्यालयातदेखील शुकशुकाट पसरल्याचे चित्र होते.

Web Title: No nomination form for the first day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.