शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये; शरद पवारांनी दिला होता काँग्रेसला सल्ला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 19:06 IST

Prakash Ambedkar Akola: प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत असलेल्या अकोला मतदारसंघात काँग्रेस आपला उमेदवार न देता आंबेडकर यांना पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.

Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही जागावाटप निश्चित झाले नसल्याने प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. मविआसोबत न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही आंबेडकर यांनी आपण काँग्रेसला सात लोकसभा मतदारसंघांमध्ये पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार वंचित आघाडीने नागपूर आणि कोल्हापूर या दोन जागांवर काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत असलेल्या अकोला मतदारसंघात काँग्रेस आपला उमेदवार न देता आंबेडकर यांना पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु काँग्रेसने धक्कातंत्राचा अवलंब करत डॉ. अभय पाटील यांना अकोल्यातून काल उमेदवारी जाहीर केली.

अकोल्याच्या जागेबाबत आता एक नवी माहिती समोर आली असून प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार देऊ नये, असं शरद पवारांनी काँग्रेसला सुचवलं होतं, असे समजते. आंबेडकर यांना मानणारा एक मोठा वर्ग राज्यात आहे आणि हा वर्ग दुखावला जाऊ नये, यासाठी पवारांनी काँग्रेसला हा पर्याय सुचवला होता, अशी माहिती आहे. मात्र पवारांच्या या सल्ल्यानंतरही काँग्रेसने आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यभरात आपली ताकद उभी केली आहे. या ताकदीचा अनुभव मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये इतर राजकीय पक्षांना आला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला अनेक जागांवर वंचितचा फटका बसला. वंचितच्या उमेदवाराने घेतलेल्या लक्षणीय मतांमुळे आघाडीच्या उमेदवारांच्या पदरी पराभव आला. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने केला. मात्र मविआ नेत्यांच्या या प्रयत्नांना यश आलं नाही. असं असलं तरी देशात भाजपला रोखण्यासाठी आपण काँग्रेसला काही जागांवर मदत करण्यास तयार असल्याचं आंबेडकर यांनी जाहीर केलं होतं. मात्र वंचितने महाविकास आघाडीत समाविष्ट होण्यास सकारात्मकता न दाखवल्याने काँग्रेस हायकमांडने सोमवारी रात्री डॉ. अभय पाटील यांना अकोल्यातून उमेदवारी जाहीर केली.

२०१९ मध्येही अभय पाटील होते रिंगणात 

डॉ. अभय पाटील यांना काँग्रेसने २०१९ मध्येही उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. पाटील तेव्हा शासकीय सेवेत वैद्यकीय  अधिकारी होते. निवडणूक लढवण्यासाठी शासकीय सेवेचा राजीनामा द्यावा लागतो. डॉ. पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजीनामाही दिला होता. मात्र, शासनाने तेव्हा त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही आणि त्यांना उमेदवारी जाहीर होऊनही निवडणूक लढवता आली नव्हती.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४akola-pcअकोलाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४