शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

निमकर्दा येथे १४ एकरातील गावतलावाचे काम अर्धवट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:43 IST

हातरुण :  बाळापूर तालुक्यातील निमकर्दा येथे १४ एकरात गावतलाव साकारत असताना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या गावतलावाचे काम ठप्प पडले आहे.

- संतोष गव्हाळेहातरुण :  बाळापूर तालुक्यातील निमकर्दा येथे १४ एकरात गावतलाव साकारत असताना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या गावतलावाचे काम ठप्प पडले आहे. ई - क्लास जमिनीवर साकारत असलेल्या या गावतलावाचे काम सुरू करण्याचा मुहूर्त कधी निघतो याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.अकोट - अंजनगाव मार्गाचे चौपदरिकरनाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गाच्या निर्मिती मध्ये निमकर्दा येथील ई - क्लास जमिनीचे खोदकाम करून त्यातील मुरुम वापरण्यात येत आहे. १४ एकरात जेसीबी आणि पोकलँड मशीनच्या साह्याने खंडाळा ते मांजरी नाल्याच्या बाजूने गावतलावाचे खोदकाम सुरू होते. या मुरुमाची मोठ्या ट्रकने वाहतूक सुरू होती. मात्र अचानक या तलावाच्या ठिकाणी सुरू असलेले खोदकाम बंद करण्यात आले. १४ एकरातील गावतलावचे काम ठप्प पडल्याने या पावसाळ्यात या तलावात पाणी साठवणार नाही. निमकर्दा आणि टाकळी निमकर्दा गावातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी निमकर्दा ते मोरगाव सादीजन मार्गावर १४ एकराच्या गावतलावासाठी प्रयत्न केले. साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या निमकर्दा येथे १४ एकरातील गावतलावाच्या आजूबाजूच्या भिंतीचे काम अर्धवट असून तलावाचे खोलीकरण १० फूट पर्यंत झाले आहे. या तलावाचे खोलीकरण १५ फूटपर्यंत पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी या तलावाचे काम झाल्यास या तलावात पाणीसाठा राहणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी या तलावाच्या कामाची बाळापूरचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी पाहणी केली होती. मे महिन्यात अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून यावर उपाययोजना करण्यासाठी गावतलावाच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे असतांना याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दृष्काळ सदृष्य परिस्थितीत हा गावतलाव साकारल्यास जीवनदायी ठरणार आहे. या गावतालावामुळे गुराढोरांची तहान भागणार असून नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळणार आहे. गावतलावातील पाण्यामुळे गावातील जलस्त्रोतात वाढ होण्याच्या दृष्टीने हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.

बंद पडलेल्या कामाला मुहूर्त सापडेना!

अकोट - अंजनगाव मार्गाचे चौपदरिकरनाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गाच्या निर्मिती मध्ये निमकर्दा येथील ई - क्लास जमिनीचे खोदकाम करून त्यातील मुरुम वापरण्यात येत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुरुमाचे खोदकाम बंद करण्यात आले. अकोट - अंजनगाव मार्गाचे चौपदरिकरणा साठी निमकर्दा ऐवजी दुसऱ्या गावातून मुरुम नेण्यात येत असल्याने निमकर्दा गावतलावचे काम ठप्प पडले आहे.

दृष्काळ सदृष्य परिस्थितीत निमकर्दा गावतलाव साकारल्यास जीवनदायी ठरणार आहे. या गावतालावामुळे गुराढोरांची तहान भागणार असून नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळणार आहे. गावतलावातील पाण्यामुळे गावातील जलस्त्रोतात वाढ होण्याच्या दृष्टीने हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केल्यास लोकसहभाग मिळणार आहे.      -  नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार, बाळापूर. 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई