शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पिकांच्या व्यवस्थापनाची गरज!

By admin | Updated: November 17, 2014 01:29 IST

एकात्मिक किड व्यवस्थापनाची गरज; कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक.

अकोला: रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीपासूनच काळजी घेण्याची गरज असून, किडीचे एकात्मिक व्यवस्थापन केल्यास उत्पादनात भर पडत असल्याने शेतकर्‍यांनी योग्य नियोजन करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ओलिताखालील गव्हाची पेरणीसाठी एच.डी.-२१८९, एकेडब्ल्यू १0७१, एच.डी.२३८0, एमएसीएस-२४९६ या वाणांच्या लागवडीची शिफारस केलेली आहे. गहू पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे अनिवार्य आहे. हरभरा पिकांची पेरणी मागील आठवड्यापर्यंत तर काही शेतकर्‍यांनी रविवार, १६ नोव्हेंबरपर्यंत पेरणी केली आहे. या पिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकर्‍यांनी बीज प्रक्रिया ही महत्त्वाची उपाययोजना पेरणीसमयी करण्याची गरज आहे. हरभरा या पिकावर सुरुवातीपासूनच घाटेअळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकर्‍यांनी या किडीचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. ही कीड हरभर्‍याचे प्रचंड नुकसान करीत असते. त्यासाठी सुरुवातीला एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याची गरज असून, या किडीचा प्रादुर्भाव अधिक वाढल्यास कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. यावर्षी पाऊस नसल्याने शेतकर्‍यांना काळजी घ्यावी लागणार आहे. शेतकर्‍यांनी कोबी, फुलकोबीच्या रोपाची पुनर्लागवड करावी, तसेच मुळा, गाजराच्या बियाण्यांची पेरणी करावी, इतर पालेभाज्यांची टप्याटप्याने पेरणी करणे गरजेचे आहे. या शिवाय रब्बी कांदा पेरणीसाठी रोपवाटिका तयार केली असेलच, नसेल तर रोपवाटिका तयार करावी, या काळात गुलाबाची हलकी छाटणी करणे आवश्यक आहे. निशिगंधा व गिलार्डिया या फुलांच्या काढणीचा वेळ असल्याने या फुलांची काढणी करावी.