घरगुती गॅस,पेट्राेल दरवाढी विराेधात राष्ट्रवादी रस्त्यावर; चूलीवर बनविला स्वयंपाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 16:55 IST2021-07-03T16:55:31+5:302021-07-03T16:55:47+5:30
NCP Agitation against fuel price hike : महिला पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर चूल मांडत स्वयंपाक तयार करुन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

घरगुती गॅस,पेट्राेल दरवाढी विराेधात राष्ट्रवादी रस्त्यावर; चूलीवर बनविला स्वयंपाक
अकाेला: पेट्राेल,डिजेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असतानाच मागील चार दिवसांपूर्वी घरगुती गॅसच्या दरातही माेठी वाढ करण्यात आल्याने गरीबांचे कंबरडे माेडले आहे. केंद्रातील माेदी सरकारला गरीब व सर्वसामान्य जनतेशी कवडिचेही साेयर सुतक नसल्याचा आराेप करीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वात शनिवारी खुले नाट्यगृह चाैकात केंद्र शासनाविराेधात जाेरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर चूल मांडत स्वयंपाक तयार करुन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.
केंद्र शासनाने रस्ता वाहतूक कर कमी केल्यास पेट्राेल, डिजेलच्या दरात घसरण हाेउ शकते. दरवाढ केलेल्या इंधनाच्या माध्यमातून केंद्र शासन तिजाेरी भरण्याचा प्रयत्न करीत असून यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याचा आराेप करीत राष्ट्रवादीचे लाेकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते शनिवारी रस्त्यावर उतरले. या आंदाेलनात विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी , श्याम अवस्थी, प्रा. विश्वनाथ कांबळे, यूसुफ अली, रफीक सिद्दीकी, ऊषा विरक , मनोज गायकवाड, अजय रामटेके, अफसर कुरेशी, नितिन झापर्डे, अब्दुल रहीम पेंटर, दिलीप देशमुख, सुषमा निचळ, संतोष डाबेराव, याकूब पहेलवान, फजलु पहेलवान, मंदा देशमुख, देवानंद ताले , बुढन गाडेकर, अजय मते, अब्दुल अनिस, भारती निम, संदीप तायडे, रिजवाना अजीज, पापाचंद्र पवार, सलीम गन्नेवाला, मोहम्मद सालार, रवि गीते, मोहम्मद फिरोज, शुभम ढोले, रोहित देशमुख ,योगेश हुमने, शुभम पिठलोड, शौकत अली शौकत, सिकंदर खान, अज्जू कप्तान, मुन्ना पहलवान, राजू नींदाने, प्रमोद बंछोड़, मोहम्मद मोहसिन, राजेश अन्ना ,अनिल मालगे, शालिनी येऊतकर ,अख्तर बेगम, अक्षय जटाले, ज्योति मांगे, मेघा पाचपोर, प्रीति सिरभातें, छाया वानखड़े, लक्ष्मी बोरकर , कांचन पाचपोर, आरती गायकवाड, किरण पवार, वैशाली सोनोने, सुनीता देशमुख आदिसह असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते.