राष्ट्रीय कुस्तीपटूची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 07:01 IST2019-05-10T07:01:28+5:302019-05-10T07:01:45+5:30

राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू तसेच अकोल्यातील रहिवासी शुभम कडोळे बयांनी गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील शिव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या झाडाला  गळफास घेऊन आत्महत्या केली. 

National wrestling Player Suicide in Akola | राष्ट्रीय कुस्तीपटूची गळफास घेऊन आत्महत्या

राष्ट्रीय कुस्तीपटूची गळफास घेऊन आत्महत्या

अकोला : राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू तसेच अकोल्यातील रहिवासी शुभम कडोळे बयांनी गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील शिव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या झाडाला  गळफास घेऊन आत्महत्या केली. 

खेडकर नगर येथील रहिवासी तसेच राष्ट्रीय कुस्तीपटू शुभम कडोळे (26) यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात असलेल्या शिव मंदिराच्या पाठीमागील एका नाल्यातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठून  घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर शुभमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचारमध्ये पाठविला. शुभम कडोळे या युवकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शुभम हा संगणक अभियंता होता.

 

Web Title: National wrestling Player Suicide in Akola