शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महिला सफाई कर्मचाऱ्यांना करावी लागतील नाला सफाईची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 11:09 IST

Akola Municipal Corporation : कामाची जबाबदारी साेपविण्याच्या अनुषंगाने कामाला लागण्याचे निर्देश आयुक्त निमा अराेरा यांनी आराेग्य निरीक्षकांना दिले आहेत़.

अकाेला : शहरातील पडीक वाॅर्डाची संकल्पना बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त निमा अराेरा काेणत्याही क्षणी घेण्याची शक्यता आहे़. त्यामुळे मनपाच्या आस्थापनेवरील पुरुष व महिला सफाई कर्मचाऱ्यांचे उपलब्ध संख्याबळ लक्षात घेता महिला सफाई कर्मचाऱ्यांनादेखील नाला सफाईची कामे करावी लागणार आहेत़. कर्मचाऱ्यांच्या उपलब्ध संख्येनुसार कामाची जबाबदारी साेपविण्याच्या अनुषंगाने कामाला लागण्याचे निर्देश आयुक्त निमा अराेरा यांनी आराेग्य निरीक्षकांना दिले आहेत़.

शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे तसेच नाल्या व सर्व्हिस लाइनमध्ये दैनंदिन साफसफाई केल्या जाते, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जाताे़. स्वच्छतेच्या कामासाठी मनपाच्या आस्थापनेवर ७४२ पेक्षा अधिक कर्मचारी आहेत़ यांच्या वेतनापाेटी मनपाकडून वर्षाकाठी २१ काेटी रुपये खर्च केले जातात़ दुसरीकडे पडीक वाॅर्डात खासगी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांच्या देयकापाेटी मनपा प्रशासनाकडून वर्षाकाठी ५ काेटी ६० लक्ष रुपये अदा करते़. अर्थात वेतन व देयकापाेटी २७ काेटी रुपये खर्च केल्यानंतरही शहरात सर्वत्र पसरलेली घाण, धुळीने माखलेले रस्ते, घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्या व सर्व्हिस लाइनचे किळसवाणे चित्र पहावयास मिळते़ ही बाब लक्षात घेऊनच मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी स्वच्छतेच्या मुद्याकडे लक्ष दिल्याचे दिसून येत आहे़.

 

म्हणून महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढली !

आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला की त्यांच्या पदावर कुटुंबातील काेणत्याही एका सदस्याची नियुक्ती केली जाते़. पत्नीला सेवेत रुजू करून घेतल्यानंतर कालांतराने राजीनामा देऊन मुलाला सेवेत घेण्यात येते़. यामुळे मध्यंतरीच्या काळात पुरुषांच्या बराेबरीत महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने महिलांची संख्या वाढली़. त्यामुळे नाइलाजाने महिलांवर नाला सफाईची जबाबदारी साेपविल्या जाणार असल्याचे संकेत आहेत़.

 

तीन सफाई कर्मचाऱ्यांचे आदेश रद्द

मनपाच्या संगणक विभागात प्रभारी संगणक चालक म्हणून कार्यरत असलेले लखन चंडाले, सतीश झांझाेटे व श्रीमती शाेभा रिल यांचा आदेश रद्द करीत त्यांना मूळ सफाई कर्मचारी पदावर रुजू हाेण्याचा आदेश मनपा उपायुक्त पंकज जावळे यांनी जारी केला आहे़ सदर तीनही कर्मचाऱ्यांना लवकरच नाला सफाई, रस्त्यांची झाडपूस व सर्व्हिस लाईनच्या साफसफाईची जबाबदारी साेपवली जाणार आहे़

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला