शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

गुरू नानक जयंतीनिमित्त नगर कीर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 6:38 PM

रविवारी सकाळी अकोल्यातील शीख बांधवांनी शहरातून नगर कीर्तन मिरवणूक काढली.

अकोला : शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांची ५५० वी जयंती मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येणार असून, यानिमित्त रविवारी सकाळी अकोल्यातील शीख बांधवांनी शहरातून नगर कीर्तन मिरवणूक काढली. गुरू नानक यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.ऐतिहासिक जयंती उत्सवानिमित्त शहरातील रेल्वे स्टेशन भागातील गुरुद्वारामध्ये शीख बांधवांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी पहाटेपासूनच या कार्यक्रमांना प्रारंभ झाला. गुरुद्वारामध्ये जमलेल्या शीख बांधवांनी पहाटे ६.३० वाजता नगर कीर्तन मिरवणूक काढली. या मिरवणुकीत सुमारे ३०० शीख बांधव सहभागी झाले होते. गुरू नानक यांचा जयघोष करीत ही मिरवणूक शहरातील विविध मार्गांनी मार्गक्रमण करीत मिरवणूक पुन्हा रेल्वे स्टेशन भागातील गुरुद्वारामध्ये परत आली. ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. तेथे शबद-कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी लंगरचेही आयोजन करण्यात आले होते. 

२१ किलोचा ‘केक’ ठरला आकर्षण!शहरातील विविध मार्गांनी गेलेली नगर कीर्तन मिरवणूक जठारपेठ भागातील ‘विरा दा धाबा' येथे आली असता, या ठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. यानिमित्त २१ किलो वजनाचा केक कापण्यात आला. 'विरास केेक अँड बेेेक'च्या संचाालिका राधिका कौर छटवाल यांनी बनविलेला आठ फूट लांब व चार फुट रुंदीचा हा केक आकर्षणाचे केंद्र ठरला होता. मान्यवरांच्या हस्ते केप कापण्यात येऊन मिरवणुकीत सहभागींना वितरित करण्यात आला.

 

टॅग्स :AkolaअकोलाsikhशीखIndian Traditionsभारतीय परंपरा