मूर्तिजापूर : मूर्तिजापूर - अचलपूर - यवतमाळ दरम्यान चालविल्या जाणाऱ्या शकुंतला रेल्वेचा कारभार चालणाऱ्या सिनिअर सेक्शन इंजिनिअर कार्यालयाला २४ मे रोजी पहिटे ५:३० वाजताच्या दरम्यान आग लागल्याने रेल्वे साहित्यासह दस्तऐवज खाक झाले. या कार्यालयातून सद्यस्थितीत बंद असलेल्या शकुंतला रेल्वेचा कारभार पाहिला जातो. टिन पत्र्यांनी तयार करण्यात आलेल्या या कार्यालयास पहाटेच्या सुमारास आग लागली. पहाटे लागलेल्या आगीत कार्यालयात असलेले रेल्वे संबंधी संपूर्ण दस्तावेज खाक झाले. तर कार्यालयासह कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येत असलेले दोन संगणक व फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने रेल्वे प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिक नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली . या कार्यालयात महत्त्वाचे दस्तऐवज असल्याने ही आग लावली की, लावण्यात आली याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी ) ही आग कशी लागली या संदर्भात आपल्याला कुठलीही माहिती नाही, सकाळी ६ वाजताचे दरम्यान कर्मचाऱ्यांने फोन करून आग लागल्याची माहिती दिली. या आगीत रेल्वे प्रशासनाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असले तरी नेमका आकडा सांगता येणार नाही. - एस. जी. मिश्रा, सिनिअर सेक्शन इंजिनिअर, मूर्तिजापूर रेल्वे
मूर्तिजापूर : रेल्वेच्या 'सिनिअर सेक्शन इंजिनिअर' कार्यालयाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 15:58 IST
शकुंतला रेल्वेचा कारभार चालणाऱ्या सिनिअर सेक्शन इंजिनिअर कार्यालयाला २४ मे रोजी पहिटे ५:३० वाजताच्या दरम्यान आग लागल्याने रेल्वे साहित्यासह दस्तऐवज खाक झाले.
मूर्तिजापूर : रेल्वेच्या 'सिनिअर सेक्शन इंजिनिअर' कार्यालयाला आग
ठळक मुद्देआगीत कार्यालयात असलेले रेल्वे संबंधी संपूर्ण दस्तावेज खाक झाले. दोन संगणक व फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने रेल्वे प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली .