शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुर्तीजापूर निवडणूक निकाल : हरीश पिंपळे यांचा अखेर निसटता विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 20:39 IST

Murtizapur Vidhan Sabha Election Results 2019: हरीष पिंपळे यांनी वंचित बहूजन आघाडीच्या प्रतिभा अवचार यांच्यावर निसटता विजय मिळविला.

- संजय खांडेकरअकोला : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत भाजपचे विद्यमान आमदार हरीष पिंपळे यांनी वंचित बहूजन आघाडीच्या प्रतिभा अवचार यांच्यावर निसटता विजय मिळविला. पिंपळे यांना ५९२२७ मते मिळाली, तर प्रतिभाव अवचार यांना ५७६१३ मते मिळाली. पिंपळे १०१० मतांनी विजयी झाले. दरम्यान, प्रतिभा अवचार यांनी आक्षेप घेतल्याने अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला नाही. 

जिल्ह्यात मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात काट्याची लढत झाली. ही लढत मतमोजणीच्या अखेरपर्यंत वादात राहिली. भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांनी अखेर निसटता विजय मिळविला; मात्र आक्षेपामुळे येथील चित्र प्रशासकीय स्तरावर स्पष्ट झाले नाही.वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा अवचार यांनी भाजपच्या हरीश पिंपळेंना मागे टाकीत आघाडी घेतली. सलग २६ फेरीपर्यंत अवचार आघाडीवर राहिल्या; मात्र २७ व्या फेरीत हरीश पिंपळे यांनी १५२ मतांची आघाडी घेतली.२७ व्या फेरीपर्यंत भाजपचे हरीश पिंपळे यांना ५६६७१, वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा अवचार यांना ५६,५१९ , राष्ट्रवादीचे रवी राठी यांना ३९९०६ मते मिळाली होती.भाजप-वंचितमधील कमी मतांचे अंतर आणि त्यावर घेण्यात आलेल्या आक्षेपामुळे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पेच कायम होता, त्यामुळे २८ व्या फेरीची मतमोजणी आणि निकाल उशिरापर्यंत थांबवून ठेवण्यात आला.राजकुमार नाचणे यांनी भाजपात केलेली बंडखोरी आणि पिंपळेंच्या वाचाळ वक्तव्यामुळे मतदारसंघात प्रचंड नाराजी पसरली होती; मात्र खासदार संजय धोत्रे त्या उपरांतही पिंपळे यांना घेऊन मतदारसंघात प्रचारार्थ फिरलेत. त्यामुळे पिंपळे यांना निसटता विजय काबीज करता आला; मात्र प्रतिभा अवचार यांना विजयाने हुलकावणी दिली. अवचार यांच्यापेक्षा जास्त मते पिंपळे यांना अखेर फेरीत मिळाली. त्यावर अवचार यांचा आक्षेप असल्याने प्रशासनाने मतमोजणी जाहीर केली नाही.

 

टॅग्स :murtizapur-acमूर्तिजापूरHarish Pimpleहरिष पिंपळेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा