शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

अकोला जिल्हा परिषदेत ‘शिवसंग्राम’चे मुंडन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 5:02 PM

अकोला : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या बाळापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कार्यवाही होत नसल्याचा जाहीर निषेध करीत शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर सामुहिक मुंडन आंदोलन केले.

ठळक मुद्देबाळापूर पं.स.चे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .त्यांना त्वरित निलंबित करून त्यांच्या कृत्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने २४ मे रोजी केली होती.कार्यकर्त्यांनी शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या देऊन निषेध व्यक्त केला व सामुहिक मुंडन केले.

अकोला : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या बाळापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कार्यवाही होत नसल्याचा जाहीर निषेध करीत शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर सामुहिक मुंडन आंदोलन केले.बाळापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांना त्वरित निलंबित करून त्यांच्या कृत्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने २४ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली होती.बाळापूर पं.स.चे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या विनयभंगाच्याप्रकरणी बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .अशा जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून असे कृत्य अपेक्षित नव्हते, महिलांवर वाईट नजर ठेवणाºया अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचले गेले पाहिजे. या घटनेने शासनाची प्रतिमा मलीन झाली असून, या दोघांनाही तत्काळ निलंबित करावे, असे निवेदनात म्हटले होते. निवेदन दिल्यानंतरही गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष अक्षय पाटील झटाले, निखिल बोरीकर, आनंद घोगरे व इतर कार्यकर्त्यांनी शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या देऊन निषेध व्यक्त केला व सामुहिक मुंडन केले. येत्या सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास शिवसंग्रामच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. संदीपदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या या आंदोलनात ज्ञानेश्वर शेळके, धनंजय माळी, आकाश घाटोळ, अंकुश मोटे, सुशांत लांडगे, हरिष जंगम, अनिकेत शेंडे, भूषण पाटील, मयुरेश हुशे, पवन पल्हाडे, दीपक प्राणजळे, आशुतोष बोधडे, ओम जऊळकार, शुभम लोटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदagitationआंदोलन