दोन वर्षांच्या चिमुकलीसह आईचा घुंगशी बॅरेजमध्ये बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2022 06:17 PM2022-02-06T18:17:00+5:302022-02-06T18:19:59+5:30

Mother drowned in Ghungshi barrage with two-year-old Girl : आराध्या (वय २ वर्ष) हिचा पाय घसरुन बॅरेज मध्ये असलेल्या पाण्यात कोसळली.

Mother drowned in Ghungshi barrage with two-year-old Girl | दोन वर्षांच्या चिमुकलीसह आईचा घुंगशी बॅरेजमध्ये बुडून मृत्यू

दोन वर्षांच्या चिमुकलीसह आईचा घुंगशी बॅरेजमध्ये बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्दे वडिलांना वाचविण्यात यश  घुंगशी बॅरेज पारद येथील घटना 

मूर्तिजापूर : तालुक्यातील पारद  येथील घुंगशी बॅरेज वरुन येत असताना  चिमुकली आराध्या (वय २ वर्ष) हिचा पाय घसरुन बॅरेज मध्ये असलेल्या पाण्यात कोसळली. तिला वाचविण्यासाठी आई व वडीलांनी पाठोपाठ पाण्यात उडी घेतली. यात चिमुकलीसह आईचा मृत्यू झाला. उपस्थित चौकीदाराच्या प्रसंगावधानाने वडीलाचे प्राण वाचले. सदर घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. 
            पारद येथील रहिवासी असलेले गौरव सुरेश तायडे (वय ३२ वर्ष ) हे पत्नी प्रिया गौरव तायडे (२८) व मुलगी आराध्या (२) हे तिघे नदिपलीकडे असलेल्या दर्यापूर तालुक्यातील धामोडी या गावी  मावशीच्या अंत्यविधीचा गेले होते. अंत्यविधी आटोपून दुसऱ्या दिवशी  दि  ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वा दरम्यान परत येत असताना  बॅरेज जवळ आल्यानंतर गेट बंद असल्याने चौकीदार संजय भाऊराव गवई यांना चावी मागीतली या दरम्यान मुलगी गेट बाजुला गेली तेव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली.  तिला वाचवण्यासाठी आई प्रिया व वडिल गौरव यांनी पाण्यात उडी घेतली. यावेळी चौकीदार संजय गवई यांनी आरडाओरडा केला तेंव्हा बाजूला असलेल्या भोई समाजातील युवक धावुन आले व त्यांनी पाण्यात दोर फेकला या दरम्यान माय लेकीचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला. परंतु वडील गौरव यांने दोर पकडल्याने त्याचे प्राण वाचले.
          घुंगशी बॅरेज पारद येथे असले तरी घटनास्थळाचा भाग दर्यापूर पोलिस स्टेशन हददित येत असल्याने घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिस व जिल्हा शोध बचाव पथक जिल्हाधिकारी पथकासह  घटनास्थळी दाखल झाले, शोध पथकाने शोध मोहीम सुरू करताच  प्रथम आई ( प्रिया)हिचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर चिमुकली कु आराध्या हिचा मृतदेह सापडला दोन्ही मृतदेह शवविच्छेदन साठी दर्यापूर येथे पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास ठाणेदार आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस करीत आहे.  


घटनेबाबत चौकशी व्हावी - प्रियाच्या वडिलांची तक्रार

मृतक प्रिया गौरव तायडे व तिची मुलगी आराध्या यांच्या मृत्यू बद्दल प्रियाचे वडील विठ्ठल गोविंदराव फुंडकर राहणार हनवतखेडा यांनी आक्षेप घेत दोघींचा मृत्यू नेमका पाय घसरून किंवा उडी घेतली की, यांना पाण्यात ढकलून देण्यात आली अशी शंका उपस्थित करुन या आशयाची तक्रार दर्यापूर पोलीसात दाखल केली.

Web Title: Mother drowned in Ghungshi barrage with two-year-old Girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.