शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

मोर्णा स्वच्छतेसाठी प्रशासन सज्ज; लोकप्रतिनिधींनी केले आवाहन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:59 AM

अकोला : सध्या प्रदूषित झालेली मोर्णा नदी लोकसहभागातून स्वच्छ करण्याचा श्रीगणेशा येत्या शनिवारपासून होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासनासह विविध सामाजिक संघटना सज्ज झाल्या आहेत.  

ठळक मुद्दे१४ पथकांचे केले गठन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सध्या प्रदूषित झालेली मोर्णा नदी लोकसहभागातून स्वच्छ करण्याचा श्रीगणेशा येत्या शनिवारपासून होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासनासह विविध सामाजिक संघटना सज्ज झाल्या आहेत.  शहरातील घाण सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी मोर्णा नदीचा वापर केला जात असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. नदी पात्रात वाढलेली जलकुंभी, डासांची पैदास व दुर्गंधीमुळे नदीकाठच्या रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकसहभागातून मोर्णा नदीचे पात्र  स्वच्छ करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला आहे. 

सौंदर्यीकरणासाठी केंद्र सरकार सकारात्मक - खा. धोत्रे 1 - साबरमतीच्या धर्तीवर सौंदर्यीकरणासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने केंद्र सरकार व राज्य सरकार सकारात्मक असून, लवकरच या बाबत मार्णेच्या संदर्भातील परियोजनेला मंजुरी मिळेल, असा आशावाद खा. संजय धोत्रे यांनी व्यक्त केला.  १३ जानेवारी २0१८ रोजी सकाळी ८.00 वा शहर कोतवालीजवळील गणेश घाटावर उपस्थित राहून नागरिकांनी मोर्णा स्वच्छता अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन खा. संजय धोत्रे यांनी केले आहे.2 - पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी  यांनी नद्यांची स्वच्छता व पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत मोर्णा नदीची स्वच्छता व पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी साबरमती नदी प्रकल्पाची पाहणी करून त्या धर्तीवर मोर्णेचा प्रस्ताव तयार करण्याचे  निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार नदी विकास व गंगा शुद्धीकरण खात्याच्या केंद्रीय मंत्री उमा भारती तसेच केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी  यांना प्रथम टप्प्यात दोन कोटी रुपये उपलब्ध करणे तसेच प्रस्तावास मंजुरी व निधी देण्यासाठी मागणी करून वेळोवेळी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

लोकप्रतिनिधींनी केले आवाहनया मोहिमेत सर्व अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार रणधीर सावरकर यांच्यासह महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह जिल्हा पत्रकार संघ तसेच विविध संघटना व सामाजिक संस्थांनी केले आहे. 

१४ पथकांचे केले गठन१३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मोर्णा नदीच्या साफसफाईला सिटी कोतवाली चौक ते हिंगणा फाटा परिसरापर्यंत सुरुवात केली जाईल. एकाच ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊन कामकाजात व्यत्यय येणार नाही, यासाठी १४ पथकांचे गठन करण्यात आहे असून, प्रत्येक पथकाला नदीच्या काठावर जागा निश्‍चित करून दिल्या आहेत. या  मोहिमेचे प्रमुख उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे हे असून, प्रत्येक पथकात मनपाचे झोन अधिकारी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्या देखरेखीखाली सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा समावेश राहील.

असे राहील अभियानशनिवारी सकाळी आठ वाजता नियोजित ठिकाणी एकत्र यावे. सकाळी ८ ते १२ दरम्यान o्रमदानातून स्वच्छता अभियान  नदीकाठी तीन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात काठावर जाण्यासाठी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. नदीपात्रात उतरून जलकुंभी काढण्यासाठी अनुभवी ६0 कामगारांची मदत घेण्यात आली आहे. काठावर टाकण्यात आलेली जलकुंभी नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टर व घंटागाडीमध्ये भरण्यात येईल. मोहिमेत सहभागी होणार्‍या नागरिकांच्या सुरक्षेसाठी गमबूट, हातमोजे, चेहर्‍याला मास्क आदी साहित्य उपलब्ध करून दिले जाणार  आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरriverनदीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान