अश्लील इशारे करून विवाहीतेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 18:02 IST2019-10-28T18:02:19+5:302019-10-28T18:02:25+5:30

कारमधून त्याने विवाहीतेला अश्लील इशारे क रून विनयभंग केल्याची घटना २५ आॅक्टोबर रोजी रात्री उशीरा घडली.

Molestation of women in Akola | अश्लील इशारे करून विवाहीतेचा विनयभंग

अश्लील इशारे करून विवाहीतेचा विनयभंग

अकोला - सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तोष्णीवाल ले आउटमधील रहिवासी जय बांगड नामक इसमाने याच परिसरातील रहिवासी असलेल्या एका विवाहीतेचा तीच्या घरासमोर वाहन उभे केले. त्यानंतर या कारमधून त्याने विवाहीतेला अश्लील इशारे क रून विनयभंग केल्याची घटना २५ आॅक्टोबर रोजी रात्री उशीरा घडली. या प्रकरणी पोलिसांनी जय बांगड याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
तोष्णीवाल ले आउटमधील रहिवासी जय बांगड हा त्याची कार क्रमांक एम एच ३० एझेड ६६६१ ही सदर विवाहीतेच्या घरासमोर उभी करतो. त्यानंतर विवाहीतेला अश्लील इशारे करतो. तसेच वारंवार घरासमोर कार उभी करून विवाहीतेच्या घराक डे डोकावून पाहतो. हा प्रकार सदर महिलेच्या पतीच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात केली. एवढेच नव्हे तर जय बांगड याने महिलेच्या घरासमोर कार उभी केल्याचे तसेच विविध गंभीर बाबींचे व्हीडीओ तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही पोलिसांकडे दिल्याची माहिती आहे. यावरुन बांगड याने सदर महिलेचा संसार मोडण्याचाच प्रताप केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या प्रकरणी सदर विवाहीतेने सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी जय बांगड याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. जय बांगड हा पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सद्या त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Molestation of women in Akola