अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:03 IST2017-10-22T22:01:49+5:302017-10-22T22:03:17+5:30
तेल्हारा: तालुक्यातील वांगरगाव येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गावातीलच चार तरुणांनी २0 ऑक्टोबर रोजी विनयभंग केला. त्याबाबत पीडितेने २१ ऑक्टोबरला दिलेल्या फिर्यादीवरून चार आरोपींना तेल्हारा पोलिसांनी अटक केली.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा: तालुक्यातील वांगरगाव येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गावातीलच चार तरुणांनी २0 ऑक्टोबर रोजी विनयभंग केला. त्याबाबत पीडितेने २१ ऑक्टोबरला दिलेल्या फिर्यादीवरून चार आरोपींना तेल्हारा पोलिसांनी अटक केली.
घटनेतील अल्पवयीन मुलगी एकटी असताना नवृत्ती विश्वास मार्के, अमर हिंमत दामोदर, अरविंद वसंता दामोदर, आशीष ईश्वरदास दामोदर यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. पीडित मुलीने तक्रारीवरून उपरोल्लेखित चारही आरोपींविरुद्ध भादंविच्या ३५४ (ड) (१) व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सचिंद्र शिंदे करीत आहेत.