शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

अत्याधुनिक शौचालयांची ‘डिझाइन’ तयार केलीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:44 PM

‘डिझाइन’ तयार न केल्याने शौचालयांचे निर्माण रखडल्याचे चित्र आहे.

अकोला: शहरातील बाजारपेठ, गर्दीच्या जागा तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी दहा जागांचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने मान्यता द्यावी, यासाठी महापौर विजय अग्रवाल यांनी अनेकदा पाठपुरावा केला. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मान्यता देऊन मनपातील बांधकाम विभागाला शौचालयांची ‘डिझाइन’ तयार करण्याचे निर्देश दिले. या निर्देशाकडे बांधकाम विभागातील ‘त्या’ बेफिकीर अधिकाºयाने सपशेल पाठ फिरविल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ‘डिझाइन’ तयार न केल्याने शौचालयांचे निर्माण रखडल्याचे चित्र आहे.शहरातील मुख्य बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसह प्रशासकीय कामकाजानिमित्त बाहेरगावच्या नागरिकांची सतत वर्दळ असते. शहरात स्वच्छतागृहांची वानवा असल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने खुल्या जागा, शासकीय आवारभिंतीलगतच्या जागेचा वापर करावा लागत असल्याचे चित्र आहे. शहराच्या मध्यभागातील मुख्य बाजारपेठेत पुरुष आणि महिलांची कुचंबणा टाळण्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी आवश्यक आहे. सद्यस्थितीत बोटावर मोजता येणाºया; परंतु दृष्टीस न पडणाºया स्वच्छतागृहांमुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे. दोन वर्षांपूर्वी मनपाच्या बांधकाम विभागाच्यावतीने शहरात सात ते आठ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आले; परंतु सदर स्वच्छतागृहांची देखभाल ठेवल्या जात नसल्याने त्या ठिकाणी घाण व दुर्गंधीचे साम्राज्य आहे. शासनाच्या ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत नागरिकांसाठी मोक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुषंगाने महापौर विजय अग्रवाल यांनी मुख्य बाजारपेठेसह शहराच्या इतरही भागात मोक्याच्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले होते. या विभागाने पहिल्या टप्प्यात दहा जागा निश्चित केल्या. जिल्हाधिकाºयांच्या मंजुरीनंतर स्वच्छतागृह उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बांधकाम विभागाला ‘डिझाइन’ तयार करण्याचे निर्देश दिले होते. बांधकाम विभागाच्या कामाचा सतत ‘गजर’ करणाºया ‘त्या’ अधिकाºयाने जिल्हाधिकाºयांच्या निर्देशाला केराची टोपली दाखविल्याचे समोर आले आहे.मनपामुळे रखडले स्वच्छतागृह* दुर्गा चौकातील मुख्य नाला* जवाहर नगर चौक* सिव्हिल लाइन चौक (जि.प.सर्किट हाउस)*सिटी कोतवाली चौक, हायड्रंटजवळ* कोठडी बाजार, मुख्य नाल्याजवळ* जुना धान्य बाजार* गांधी चौक, जैन मंदिरालगत* टिळक रोड, आकार डेव्हलपर्सजवळ* जयहिंद चौक, जि.प. उर्दू शाळेचे आवार* मंगरूळपीर रोड, क्लासिक बारजवळील नाला.

महापौर साहेब, हे चाललंय काय?महापालिकेत सत्तास्थानी असलेल्या भाजपच्या कार्यकाळात स्वच्छतागृहांअभावी सर्वसामान्य नागरिकांची कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शौचालयांचे ‘डिझाइन’ तयार करण्याचे निर्देश दिल्यानंतरही मनपाचा बांधकाम विभाग काम करण्यास तयार नसेल तर महापौर साहेब, या विभागातील मस्तवाल अधिकारी-कर्मचाºयांचा तुम्ही बंदोबस्त करणार का, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका