बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी अकोल्यात ‘मॉक टेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 15:47 IST2018-04-14T15:47:55+5:302018-04-14T15:47:55+5:30

अकोला : युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून इयत्ता बारावीच्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, विधी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परिक्षांचा सराव व्हावा, या उद्देशाने युवासेना पुरस्कृत ‘मॉक टेस्ट २०१८ चे आयोजन रविवार, १५ एप्रिल रोजी करण्यात आले आहे.

  'Mock Test' in Akola on Sunday for HSC students | बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी अकोल्यात ‘मॉक टेस्ट’

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी अकोल्यात ‘मॉक टेस्ट’

ठळक मुद्देसकाळी १०.०० वाजता आर.एल.टी विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित केली आहे. नोंदणी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सीताबाई कला महाविद्यालय येथे अतिरिक्त परीक्षा केंद्र देण्यात येत आहे.परीक्षा संपल्या नंतर प्रतेक विद्यार्थ्यांना ‘मॉडेल सोलूशोन सेट’ चे वितरण युवा सेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.


अकोला : युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून इयत्ता बारावीच्या ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, विधी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परिक्षांचा सराव व्हावा, या उद्देशाने युवासेना पुरस्कृत ‘मॉक टेस्ट २०१८ चे आयोजन रविवार, १५ एप्रिल रोजी करण्यात आले आहे.
ही परीक्षा रविवार दि.१५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजता आर.एल.टी विज्ञान महाविद्यालय येथे आयोजित केली आहे. नोंदणी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सीताबाई कला महाविद्यालय येथे अतिरिक्त परीक्षा केंद्र देण्यात येत आहे. त्यामुळे ‘नीट -युजी’ परीक्षा आर.एल.टी विज्ञान महाविद्यालय येथे, तर एमएचटी­ -सीईटी पीसीएम, एमएचटी­-सीईटी पीसीबी व एमएचटी­ सीईटी लॉ च्या विद्यार्थ्यांची परीक्षा सीताबाई कला महाविद्यालय सिव्हील लाईन रोड अकोला येथे असणार आहे. परीक्षा संपल्या नंतर प्रतेक विद्यार्थ्यांना ‘मॉडेल सोलूशोन सेट’ चे वितरण युवा सेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.
यावेळीआमदार गोपीकिशन जी बाजोरिया, सहाय्यक संपर्क प्रमुक श्रीरंगदादा पिंजरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख,माजी उपजिल्हा प्रमुख बादलसिंह ठाकूर, महिला आघाडी जिल्हा संघटीका ज्योत्स्ना चोरे, शहरप्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, प्राचार्य नानोटे, प्राचार्य सिकची असणार आहेत. असे आवाहन युवासेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील, उपजिल्हाप्रमुख राहुल रामभाऊ कराळे अकोट, जिल्हा समन्वयक निखीलसिंह ठाकुर, कुणाल पिंजरकर, जिल्हासचिव अभिजीत मुळे पाटील, अकोला शहरप्रमुख नितिन मिश्रा, उपजिल्हाप्रमुख दीपक बोचरे यांनी केले आहे.

Web Title:   'Mock Test' in Akola on Sunday for HSC students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.