MLA Amol Mitkari infected with corona | आमदार अमोल मिटकरी यांना कोरोनाची लागण

आमदार अमोल मिटकरी यांना कोरोनाची लागण

अकोला : विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तब्येत चांगली असल्याचे त्यांनी ट्विटर हॅन्डलवर स्पष्ट केले आहे.काल केलेल्या ट्विट वर मिटकरी म्हणतात, ''सकाळी थोडा ताप जाणवू लागल्यामुळे मी कोरोना चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली असून,डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच औषधोपचार घेत आहे. संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच जनसेवेत रुजू होईल'' पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत आमदार मिटकरी यांनी मोठ्या प्रमाणात बैठका,सभा घेतल्या. २ दिवसात मिटकरी यांनी जवळपास 20 च्या वर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. या सभे दरम्यान त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे मोठे नेते देखील होते. रोहित पवार हे देखील अमोल मिटकरी यांच्या सोबत होते. या दोन दिवसात मिटकरी हजारो कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले असल्याची माहिती आहे. काल त्यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट केले जे कोणी आपल्या संपर्कात आले असतील त्यांनी चाचणी करून घेण्याचे आव्हाहन मिटकरी यांनी केले आहे.

Web Title: MLA Amol Mitkari infected with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.