शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बंदला मूर्तिजापूरात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 18:25 IST

Maharashtra Bandh : शिवाजी चौकातून शहरात रॅली काढून निदर्शने करण्यात आली.

मूर्तिजापूर : लखीमपुर येथे झालेल्या शेतकरी संहाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसह ११ अॉक्टोबर रोजी पुकारलेल्या बंद ला मूर्तिजापूर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.         काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व प्रहार जनशक्ती पक्ष महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या बंद यशस्वी करण्यासाठी सर्व घटक पक्ष एकत्र येऊन शिवाजी चौकातून शहरात रॅली काढून निदर्शने करण्यात आली. टांगा चौकात रॅलीची सांगता करण्यात आली. येथील व्यापारी संघाने बंद ला पाठिंबा देत दुपारी १२ पर्यंत 'बंद' मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आज सकाळपासूनच काही दुकाने बंद होती, तर काही सुरूच होती. आयोजकांनी रॅली काढून केलेल्या बंद च्या आवाहनाला प्रतिसाद देत काही प्रतिष्ठाने बंद राहिली, शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शाळा व औषधी दुकाने, दवाखाने बंदमधून वगळण्यात आले होते. बंद यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीचे भैय्यासाहेब तिडके, रवी राठी, जगदीश मारोटकर, राम कोरडे, दिवाकर गावंडे, अमोल लोकरे, विष्णू लोडम, जावेद खान, नितीन टाले, राजेंद्र मोहोड, शुभम मोहोड, तुषार दाभाडे, उज्वला राऊत, सुषमा कावरे, उषाताई जामनीकर, शिवसेनेचे संगीत कांबे, विनायक गुल्हाने, अप्पू तिडके, कॉंग्रेसचे दिनेश दुबे, बबन डाबेराव, उर्मिला डाबेराव, बंडूभाऊ डाखोरे, विजय वानखेडे, रोहित सोळंके, अशोक दुबे, प्रहारचे राजकुमार नाचणे, अमोल वानखडे, सागर पुंडकर, संदीप कोहाळे, मिथुन राठोड, संतोष इंगोले, यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विलास वानखडे यांनी दुचाकीवरुन कर्तव्यावर असलेल्या पोलीसांची तहान भागवली.

टॅग्स :Maharashtra BandhMaharashtra BandhMurtijapurमुर्तिजापूर